BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

चार वर्षापूर्वी वडिलांची आत्महत्या, न्यायाधीशांनी दिली आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार !

 


शोध न्यूज : वडिलांच्या मृत्यूचा चार वर्षापूर्वी घडलेला प्रकार उघडकीस आला असून न्यायाधीशांनी आपली वकील असलेल्या पत्नीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी वकील महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
मुळचे लातूर येथील असलेले न्यायाधीश संदीप नामदेव सरोदिया हे पुण्याच्या बाणेर येथे राहतात. त्यांचे वडील नामदेव सरोदिया यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली होती. सन २०१८ साली घडलेल्या या घटनेबाबत मुलगा न्यायाधीश संदीप सरोदिया यांनी आत्ता पोलिसात फिर्याद दिली असून ही फिर्याद त्यांनी आपल्याच परंतु विभक्त असलेल्या पत्नी तसेच अन्य दोघांच्या विरोधात दिली आहे. घटनेच्या चार वर्षांनतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या वृद्ध वडिलांनी केलेल्या आत्महत्येस त्यांनी पत्नीला जबाबदार धरले असून वकील असलेल्या पत्नीने नातीस भेटण्यासाठी गेलेल्या आपल्या वडिलांना भेटू दिले नाही शिवाय धक्काबुक्की करीत घरातून बाहेर काढल्याचे उघडकीस आल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. 


न्यायाधीश संदीप सरोदिया यांची विभाग्क्त पत्नी शालिनी उर्फ शिवानी, सासू मनीलता शर्मा आणि मेहुणा शेखर शर्मा या तिघांच्या विरोधात ही फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून न्यायमूर्ती संदीप सरोदिया आणि त्यांची पत्नी शालिनी यांच्यात घटस्फोट झालेला आहे. दोघे विभक्त झाले होते पण आजोबाला नातीचा लळा लागलेला होता. नातीला भेटण्याच्या ओढीने नामदेव सरोदिया हे सुनेच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांना या व्यक्तींनी धक्काबुक्की करून घरातून बाहेर हाकलून दिले आणि नातीचीही भेट घेवू दिली नाही. या घटनेचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. हा आघात सहन न झाल्यामुळे त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. 


मृत्युपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीचा अहवाल मिळाल्यानंतर ही बाब उघड झाली. न्यायमूर्ती संदीप यांच्या वृद्ध आईवर दुर्धर आजाराचे उपचार सुरु आहेत त्यामुळे उशिराने याबाबत तक्रार देण्यात आली आणि उशिराने गुन्हा दाखल झाला. (Father's suicide, judge files complaint against his wife) न्यायमूर्तीनी आपल्या वकील असलेल्या पत्नीच्या आणि तिच्या आई, भाऊ यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !