BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने तीन महिलांचा मृत्यू !

 

वीज दरवाढीचा प्रस्तावावर चर्चा ! वीज आणखी महाग होण्याची शक्यता !



शोध न्यूज : कालव्याच्या वितरिकेत ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा महिला जखमी झाल्या आहेत. 


शेतातील टोमॅटो काढून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून तो घरी नेला जात असताना दौंड तालुक्यातील रावणगाव येथे एका शेतात ही अपघाताची घटना घडली. टोमॅटो काढून ते ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून शेतकरी बापूराव आटोळे यांच्या घरी नेण्यात येत होते. हा ट्रॅक्टर कालव्याच्या वितरिकेत उलटला आणि ट्रॉलीच्या खाली ९ महिला सापडल्या गेल्या. यातील तीन महिला जागीच मृत्युमुखी पडल्या आणि सहा महिला जखमी झाल्या. यातील दोन महिलांना किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी चार महिला जबर जखमी झाल्या आहेत.  आटोळे यांच्या शेतातील टोमॅटो तोडून ते कॅरेटमध्ये घालून हा ट्रॅक्टर घराकडे निघाला होता. टोमॅटो तोडण्यासाठी आलेल्या महिला देखील या ट्रॉलीमध्ये बसलेल्या होत्या. 


सदर ट्रॅक्टर घराच्या दिशेने निघाला असतानाच खडकवासला कालव्याच्या कालव्यात ट्रॉली उलटली. या ट्रॉलीखाली टोमॅटोचे कॅरेट आणि ट्रॉलीत बसलेल्या ९ महिला चेंगरल्या गेल्या. या महिला ट्रॉलीखाली सापडल्या. शेतात ही घटना घडल्यामुळे वेळीच या महिलांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. स्थानिक गावकरी मदतीला धावून आले, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने या महिलांना बाहेर काढण्याचे नेटचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले परंतु त्यात अडचणी येऊ लागल्याने महिलाना वेळेत ट्रॉलीखालून बाहेर काढता आले नाही. त्यामुळे तीन महिलांचा ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला. सहा महिलांपैकी चार महिला जखमी असून उर्वरित दोन महिला किरकोळ जखमी आहेत. 

  
अपघातात जखमी झालेल्या या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्विनी प्रमोद आटोळे, रेश्मा भागुजी पानसरे आणि सुरेखा बाळू पानसरे या तीन महिलांचा मृत्यू झाला असून जखमीतील दोन महिलांनी अपघात होतानाच ट्रॉलीमधून खाली उड्या मारल्या. उडी मारल्यामुळे त्यांना मार लागला असला तरी त्या किरकोळ जखमी आहेत. (Accident Three women die after tractor trolley overturns) या अपघाताची आणि तीन महिलांचा म्रुत्यु झाल्याची माहिती गावात पोहोचली तेंव्हा गावावर शोककळा पसरली असून परिसरात देखील मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !