BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

पंढरपूर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या !



महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या ! हृदयद्रावक घटना !


शोध न्यूज : पंढरपूर येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पुणे जिल्ह्यात आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु गणित विषयाच्या तणावातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. 


पंढरपूर येथील अठरा वर्षे वयाचा कन्हैय्या तानाजी काळे हा तरुण विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकत होता. अवसरी येथील शासकीय महाविद्यालयात विद्युत विभागात प्रथम वर्षाचे शिक्षण तो घेत होता. येत्या १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी विज्ञान आणि गणित या विषयाची युनिट टेस्ट होणार असल्याने आणि गणित हा विषय त्याला अवघड जात असल्यामुळे तो तणावात होता . गणित हा विषय त्याला जमत नव्हता त्यामुळे त्याचा तणाव वाढला होता अशी माहिती वसतिगृहात त्याच्याच खोलीत राहणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनी दिली आहे.(A college student from Pandharpur committed suicide in Pune district) याच तणावातून त्याने महाविद्यालयात जाणे देखील टाळले आणि टोकाचे पाऊल उचलले. 


वसतिगृहातून अन्य विद्यार्थी महाविद्यालयात निघाले असताना कन्हैया याने मात्र महाविद्यालयात जाणे टाळले. आपल्या पोटात दुखत असल्याचे सांगून तो महाविद्यालयात गेलाच नाही. त्याचे मित्र महाविद्यालयात गेले आणि हा मात्र वसतिगृहातील खोलीवरच थांबून राहिला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला असल्याची बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी पंचनामा केला, शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गणित विषयाचा तणाव त्याच्यावर असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास सुरु आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडल्याने महाविद्यालयात खळबळ उडाली असून त्याचे मित्र शोकाकुल झाले आहेत. 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !