BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२२

ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचे टायर फोडले !

 


शोध न्यूज : शेतकरी संघटना आणि साखर कारखाने यांच्यातील संघर्ष आता वेगळ्या वळणावर जात असल्याचे दिसत असतानाच उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे सगळे टायर कापून टाकण्यात आले आहेत. 


सोलापूर जिल्ह्यात ऊस दर संघर्ष समितीने पंढरपूर येथे ऊस परिषद घेऊन गांधीगिरी दाखवत साखर कारखान्यांना आवाहन केले आणि दोन दिवसांची मुदत दिली पण साखर कारखान्यांनी कसलीही दाद दिली नाही की दखल घेतली नाही.  पहिली उचल अडीच हजार देण्यात यावी आणि अंतिम दर हा ३ हजार १०० रुपयांचा देण्यात यावा अशी मागणी संघर्ष समितीने केलेली आहे. दोन दिवसात मागणीप्रमाणे कारखान्यांनी जाहीर न केल्यास आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरु होण्याचा इशारा परिषदेत देण्यात आला होता. त्यानंतर उसाच्या फडात जाऊन समिती कार्यकर्त्यांनी उसाची तोड बंद पाडली आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालकांना वाहतूक न करण्याबाबत आवाहन केले. हात जोडून विनंत्या करण्यात आल्या तसेच अक्षरश: त्यांचे पाय देखील धरण्यात आले. 


गांधीगिरी दाखवत ट्रॅक्टरचालक आणि मालकांना शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसाची वाहतूक न करण्याचे आवाहन आणि विनंती करण्यात आली परंतु या विनंतीची फारशी दाखल ट्रॅक्टरचालक, मालकांनी घेतली नाही. यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा उग्र होण्याचे संकेत मिळू लागले होते. अखेर काल रात्री अज्ञात व्यक्तींनी ऊसाची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला थांबवून पहिला बार काढला आहे. चाळीसगाव येथील दादा गुंडीबा पाटील यांचा ट्रॅक्टर चळे येथून ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. तो वाखरीतील बाजीराव विहिरीजवळ आला असता अज्ञात तीन व्यक्तींनी अडवला. रात्रीच्या वेळेस चाकू दाखवत ट्रॅक्टर थांबवला आणि ट्रॅक्टर, ट्रॉलीचे सगळे टायर फोडून टाकण्यात आले.


  • ऊस घेऊन श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे निघालेल्या चार ट्रॅक्टरचे ४० टायर फोडण्यात आल्याची माहिती आहे.  हे टायर फोडल्यामुळे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.


अज्ञात व्यक्तींनी सगळेच तयार कापून काढल्याने ट्रॅक्टर मालकाचे अडीच  लाखांचे नुकसान झाले असून गांधीगिरीचे आंदोलन हिंसक वळणाकडे जाऊ लाल असल्याचे या घटनेने दिसून आले आहे. शेतकरी आणि साखर कारखानदारी यांच्यातील संघर्ष अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन सुरु केले आहे आणि जिल्ह्यात ही पहिली घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची पाहणी केली. 


पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला ऊस घेऊन निघालेल्या या ट्रॅक्टरच्या बाबतीत घटना घडली आहे. या ट्रॅक्टरच्या पुढे मागे अन्य काही ट्रॅक्टर होते परंतु या एकाच ट्रॅक्टरचे टायर कापून काढण्यात आले. ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांचे एकूण १२ टायर कापण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Farmers movement. Tractor and trolley tires burst) सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असून आंदोलन आता हिंसक स्वरूप धारण करू लागले असल्याचे दिसत आहे.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !