BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ ऑक्टो, २०२२

बतावणी करून 'त्या' पोलिसांने निवृत्त ग्रामसेवकाला लुटले !

 



शोध न्यूज : पोलीस असल्याची बतावणी करीत पंढरपूर - सांगोला मार्गावर एक निवृत्त ग्रामसेवकाला लुटण्याची एक घटना समोर आली आहे. अशा प्रकारात वाढ होतानाच दिसत आहे.


आपण पोलीस आहोत असे सांगून भामटे भर रस्त्यावर फसवून लुटत आहेत आणि अशा घटना आता काही नव्या राहिल्या नाहीत. 'आपण पोलीस आहोत, तुमच्या दागिन्यांना धोका आहे, ते काढून ठेवा' असे सांगितले जाते, पोलीस आहेत असे समजून त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो आणि हातचलाखी करीत हे भामटे दागिने कधी पळवतात हे लक्षातही येत नाही. अंगावरचे दागिने काढून एका फडक्यात किंवा कागदात ठेवायला सांगतात आणि याच वेळी ते चलाखी करतात. अशा अनेक घटना आजवर घडल्या असून पोलिसात याबाबत गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा प्रकारे फसवणूक केली जाते हे आता सर्वांनाच माहित झाले आहे तरी देखील लोक आपली फसगत करून घेतात. यात अशिक्षितच नव्हे तर शिकलेसवरलेले लोक देखील बळी पडताना दिसतात.

 
पंढरपूर - सांगोला रस्त्यावर अशाच तोतया पोलिसाने एका सेवानिवृत्त ग्रामसेवकांची फसवणूक केली असल्याची एक घटना समोर आली आहे. 'आम्ही पोलीस असून तुमची तपासणी करायची आहे, तुमच्याकडे गांजा, गुटखा आहे का ? हे पहायचे आहे'  असे म्हणत या भामट्यांनी सेवानिवृत्त ग्रामसेवका मोतीराम पवार यांच्या दुचाकीची डिकी तपासून पाहण्याचे नाटक केले आणि त्यांच्याकडील सोने हातोहात लांबवले. यात गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन, सोन्याचे बदाम, सोन्याची अंगठी असे दागिने डोळ्यादेखत लंपास केले पण हे करताना लक्षातही आले नाही. (Pretending to be the police, the jewels were stolen)आपली फसवणुकी झाली असल्याचे काही वेळेनंतर त्यांच्या लक्षात आले पण तोपर्यंत भामटे पसार झालेले होते. भरदिवसा, भरदुपारी या भामट्यांनी भर रस्त्यावरच ही लुट केली आहे.


निवृत्त ग्रामसेवक मोतीराम देवबा पवार हे मेथवडे फाटा येथे दवाखान्यात निघाले असताना त्यांची स्कुटी भामट्यांनी रस्त्याच्या मध्येच अडवली. पोलीस असल्याची बतावणी करीत आणि गांजा, गुटखा तपासण्याचा बहाणा करीत त्यांनी स्कुटीची डिकी तपासली. डिकीत काहीच आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी पवार यांच्या गळ्यातील दोन टोळ्याचा सोन्याचा गोफ, बदाम, अंगठी काढून घेतली. हे दागिने त्यांनी पुडीत बाधले. बांधलेली पुडी पवार यांनी परत मागितली तेंव्हा त्यांनी हातात देण्यास नकार देत ही पुडी त्यांनी स्कुटीच्या डिकीत ठेवली, पवार यांनी काही अंतर पुढे गेल्यावर तपासून पाहिले असता डिकीत पुडी होती पण त्या पुडीत दागिने मात्र नव्हते. त्यावेळी मात्र आपली फसवणूक झाली असून ते कुणी पोलीस नव्हते तर भामटे होते हे त्यांच्या लक्षात आले पण तो पर्यंत खूप उशीर झालेला होता. अशा फसवणुकीपासून प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्यकता असून कशी फसवणूक होते ते या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !