BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑक्टो, २०२२

डोळ्यादेखत जळाला प्रेमभंगी तरुण ! घटनेचा लाईव्ह व्हिडीओ !

 



शोध न्यूज : उभ्या रेल्वेवर चढून हाय होल्टेज विद्युत तारांना पकडून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करण्याची अत्यंत धक्कादायक घटना आज घडली असून या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.अनेकांना विचलित करू शकतो असा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे उभे राहत आहेत.

 
अपघाताने विजेचा शॉक बसतो आणि यात मृत्यूही होऊ शकतो परंतु थेट वीज प्रवाहित असलेल्या विजेचा तारांना जाणीवपूर्वक स्पर्श करून आत्महत्या करण्याची अत्यंत थरारक घटना आज पुणे येथील रेल्वे स्थानकावर घडली असून ही घटना नेमकी कशी घडली हे देखील कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. रेल्वे ही हाय होल्टेज विजेवर धावत असते आणि उच्च दाबाचा विद्युत प्रवाह असलेल्या या तारा रेल्वेच्या वरच्या बाजूस असतात. सामान्य वीज प्रवाह असला तरी शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना घडतात आणि येथे तर रेल्वेच्या उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. 


पुण्याच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म एकवर पुणे - गोरखपूर ही रेल्वे एक्सप्रेस उभी होती. याच रेल्वेत गोवर्धन मल्ला नावाचा तरुण बसलेला होता. अचानक हा तरुण रेल्वेच्या वरच्या बाजूस चढण्याचा प्रयत्न करू लागला पण रेल्वे कर्मचाऱ्याने त्याला रोखले. दोनवेळा त्याचा प्रयत्न फसला परंतु रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवत तो तिसऱ्या वेळी मात्र रेल्वेवर चढला. रेल्वेच्या काही डब्यावरून तो पुढे पुढे चालत गेला आणि त्याने रेल्वेच्या वरच्या बाजूस असलेल्या उच्च दाबाच्या तारेला पकडले. त्याने तारेला स्पर्श करताच जोराचे आवाज झाले आणि आगीचे लोळ उठले. आगीने लपेटलेला गोवर्धन एका क्षणात रेल्वेच्या डब्यावर पडला. विशेष म्हणजे या घटनेचे कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. हा व्हिडीओ पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय रहात नाही. 


सदर व्हिडीओ पाहिल्यानंतर या तरुणाचे कोळसे झाले असतील असे कोणालाही वाटेल पण सुदैवाने तसे झाले नाही, त्याचे शरीर भाजून निघाले आहे. जवळपास ८० टक्के तो भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Attempted suicide by touching a high voltage wire, Disturbing video) हा तरुण मूळचा कटक येथील असून त्याच्या खिशात विशाखापट्टणचे तिकीट देखील सापडले आहे. गोवर्धन मल्ला हा खेड तालुक्यातील खळ उंबरे गावातील एका कंपनीत कामाला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !