BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२२

मावा खाल्ल्यामुळे ऐन दिवाळीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

 



शोध न्यूज : मावा खाल्ल्यामुळे चक्कर येऊन आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीत घडली असून पुन्हा एकदा माव्याचे परिणाम समोर आले आहेत.


मावा, गुटखा खाण्याचे प्रमाण तरुण वर्गात अधिक असून महाविद्यालयीन आणि अनेक शाळकरी मुले देखील मावा, गुटखा तोंडात कोंबताना दिसून येतात. मावा अथवा गुटखा खाऊन लग्नाच्या वरातीत अथवा गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना तरुणांनी प्राण गमावल्याची अनेक उदाहरणे समोर असली तरी या प्रकारची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नसून मोहोळ तालुक्यातील एका तरुणाचा बळी माव्याच्या मोहाने घेतला असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.  मावा खाल्ल्यानंतर या तरुणाला चक्कर आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची दुर्घटना ऐन दिवाळीत घडली आहे. 


मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील खंदारे वस्ती परिसरातील अविनाश पोपट खंदारे या तरुणाचा माव्यामुळे मृत्यू झाला आहे. गॅसच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत असलेला अविनाश गॅसच्या गाडीवर कामाला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून पोखरापूर येथून मोहोळ येथे पोहोचला. मोहोळ- सोलापूर रस्त्यावरील एका हॉटेलच्या समोर तो चक्कर येऊन पडला त्यानंतर काही वेळाने अविनाश याच्याच मोबाईलवरून त्याच्या चुलत्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि याबाबत माहिती दिली. चुलते महावीर खंदारे यांना ही माहिती मिळताच त्यांच्यासह इतर नातेवाईक चैतन्य हॉटेलसमोर पोहोचले असता अविनाश हा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत त्यांना पहायला मिळाला.


महावीर खंदारे यांनी त्याला उठविले आणि चौकशी केली असता मावा खाल्ल्याने त्याला चक्कर आली असल्याची माहिती चुलते महादेव यांना मिळाली.महादेव खंदारे यांनी अविनाश याला तातडीने उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यानुसार महावीर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Unfortunate death of young man on Diwali due to eating Mawa) मावा खाल्ल्यामुळे ऐन दिवाळीत एका तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतच आहे परंतु चिंता देखील व्यक्त होऊ लागली आहे. मावा खाण्याऱ्या तरुणांची संख्या वाढत असतानाच अशा प्रकारचे मृत्यू देखील समोर येत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !