BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२२

मानवतेला कलंक ! तेरा महिन्याच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार !!

 


 

Title of the document ----------------------------------

शोध न्यूज : अवघ्या तेरा महिने वयाच्या कोवळ्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक आणि मानवतेला कलंक लावणारी घटना घडली असून या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.


लैंगिक अत्याचाराचा घटना वाढतच चालल्या असून महिलांना मुक्तपणे बाहेर पडणे कठीण होऊ लागले आहेच पण घरात एकटे थांबणेही मोठ्या धाडसाचे ठरले आहे. घरात घुसून असहायतेचा गैरफायदा उठवत अत्याचार केल्याच्या अनेक घटना या आधीच समोर आल्या आहेत. तरुणी,  शाळकरी मुलींना देखील मोकळेपणे फिरणे धाडसाचे वाटू लागलेले आहे. माणसांच्या कपड्यात गिधाडे वावरत असल्याचे सातत्याने दिसून येत असताना ही गिधाडे अल्पवयीन मुलीना देखील सोडायला तयार नाहीत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून तिचा खून करण्याचे प्रकार सतत घडत असताना मानवतेला कलंक लावणारी एक घटना पुण्यासारख्या सुसंकृत समजल्या जाणाऱ्या शहरात घडली आहे. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. 


तरुण आणि शाळकरी मुलींची सुरक्षा नेहमीच धोक्यात असल्याचे दाखविणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना पुण्यात अवघ्या १३ महिन्याचे वय असलेल्या कोवळ्या बालिकेवर राक्षसी प्रवृत्तीने अत्याचार केला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यात वारजे परिसरात घडली असल्याचे उघडकीस आले आहे. हे पाप कुणी अपरिचित व्यक्तीने नव्हे तर ज्याच्यावर भरवसा ठेवला त्याच गिधाडाने केले आहे. वारजे माळेवाडी भागात मोलमजुरी करून उपजीविका करणारे एक गरीब कुटुंब राहते. या कुटुंबावर हे मोठे संकट कोसळले आहे. ओळखीच्या राक्षसी व्यक्तीने विश्वासाला जोरदार धक्का देत हा अमानुष कृत्य केल्याचे उघडकीला आलेले आहे. 


मजुरी करणाऱ्या या कुटुंबाला १३ महिने वयाची एक चिमुकली मुलगी आहे. या चिमुकलीच्या आई वडिलांना काही कामानिमित्त बाहेर जाण्याची गरज होती. लहानग्या मुलीला कोण सांभाळणार हा प्रश्न होता. काही वेळासाठी त्यांनी शेजारील व्यक्तीकडे विचारणा केली. मित्र असलेल्या या शेजाऱ्याने मुलीला काही वेळासाठी सांभाळण्याची तयारी दाखवली. 'तुम्ही बिनधास्त जावा, मुलीकडे मी लक्ष देतो आणि तुम्ही परत येईपर्यंत मुलीची मी काळजी घेतो' असे आश्वासन शेजारी राहणाऱ्या मित्राने दिले. मोठ्या विश्वासाने आई वडील आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेर गेले. एवढ्याशा मुलीला घरात ठेवून जायला मनाची तयारी होत नव्हती परंतु शेजारी मित्राने दिलेल्या विश्वासावर त्यांनी आपल्या घरात मुलीला ठेवले आणि रिक्षातून आई वडील बाहेर निघून गेले. 


आपले काम आटोपून आई वडील घरी आले तेंव्हा हे बाळ रडत होते. लहानग्या बाळाला काही सांगता येत नव्हते परंतु वेदनेने कळवळत होते. नेमके काय झालेय हे आई वडिलांना देखील कळेना. आई वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही हे बाळ काही केल्या शांत होईना, अखेर या बाळाला घेवून आई वडील रुग्णालयात धावले. डॉक्टरांनी या बाळाला तपासले तेंव्हा एकूण प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती समजल्यावर परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहिला.


राक्षसी नराधमाच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाशवी कृत्य करणाऱ्या राक्षसाला पोलिसांनी अटक देखील केली आहे.  (Shame on humanity! Sexual assault on a thirteen-month-old girl) त्याच्याविरोधात बलात्कार केल्याचा (भारतीय दंड विधान कलम ३७६)  आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अवघा महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला आहे. सदर परिसरात तर संतापाची प्रचंड लाट उसळली असून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होऊ लागली आहे. 'पुणे तेथे काय उणे' असे गौरवाने म्हटले जाते पण एवढी भयानक घटनाही याच पुण्यात घडली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !