BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२२

चिता रचून तरुणाने शेतात केली आत्महत्या !



शोध न्यूज : आपल्या हाताने चिता रचून स्वत:ला बांधून जिवंत पेटवून घेत एका तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून यामुळे परिसराला धक्का बसला आहे.


आत्महत्या ही अलीकडे अगदीच सामान्य होत चालल्याचे दिसू लागले आहे. तरुण तरुणीत आत्महत्या करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून त्यातही आत्महत्या करण्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. फेसबुक लाईव्ह करीत काही आत्महत्या होतात तर मोबाईलवर स्टेटस ठेवत काहींच्या आत्महत्या होतात. कुणी विष प्राशन करून आयुष संपवतो तर कुणी पुराच्या पाण्यात उडी घेतो. हे सगळेच प्रकार धक्कादायक असताना नगरच्या सोनई लोहारवाडी शिवारात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. (A young man committed suicide by setting himself on fire in the field) एका २७ वर्षे वयाच्या तरुणाने आपल्या हाताने आपली चिता रचून मध्यरात्री आपले आयुष्य संपवले असल्याचे दिसून आले आहे. 


अनिल साहेबराव पुंड या तरुणाने शेतात लाकडाचे सरण रचले, त्यावर ठिबक सिंचन च्या जुन्या नळ्या टाकल्या आणि त्याला स्वत:ला तारेने बांधून घेतले. त्यानंतर ही चिता पेटवली आणि त्याच आगीत आपले आयुष संपवले. हा प्रकार जेंव्हा उघडकीस आला तेंव्हा पंचक्रोशीत खळबळ माजली. एकूण प्रकार ऐकून प्रत्येकाला मोठा धक्का बसला. पोलीसाना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी धावले. सदर तरुणाने अशा प्रकारे आपल्या जीवनाचा शेवट कशासाठी केला ? याचे उत्तर लगेच काही मिळू शकले नाही परंतु या घटनेने परिसराला मोठा हादरा बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मयत अनिल याने मध्यरात्री आपली बहिण आणि मावशी यांना व्हाॅटसअपवरुन एक संदेश पाठवला होता. त्याने घरात एक चिट्ठी लिहून ठेवलेली आहे आणि माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, मी सर्वांचा ऋणी आहे असे लिहिलेली चिट्ठी पोलिसांना मिळून आली आहे. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !