मुंबई : राज्यतील हॉटेल, चित्रपटगृहे, बार आणि रेस्टोरंट आता लवकरच पूर्ण क्षमतेने सुरु होण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत चालला आहे त्यामुळे एकेक निर्बंध देखील कमी कमी होताना दिसत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरु असल्याने काही निर्बंध कायम आहेत परंतु त्यात देखील आता हळूहळू दिलासा लाभण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोरोनाची तिसरी लाट तेवढी विध्वंसक नसल्याने बराचसा दिलासा लाभ असून आता ही लाट देखील परतीच्या प्रवासाला लागलेली आहे त्यामुळे आणखी एक दिलासा लाभला आहे, त्यातच निर्बंधाबाबत आरोग्यमंत्र्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील चित्रपटगृहे, हॉटेल, बार तसेच रेस्टोरंट आणि नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकतात असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यातील कमी होणारी कोरोना रुग्णांची संख्या ही दिलासा देणारी बाब असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याकडे शासनाचा कल आहे. सद्या पन्नास टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आलेलीच आहे, ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकतील. आरोग्य मंत्र्यांच्या या संकेतामुळे आणखी दिलासा लाभला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !