BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑक्टो, २०२२

मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो यात माझी चूक काय ? विजय माने उच्च न्यायालयात !

 



शोध न्यूज : मुख्यमंत्री यांच्यासारखा दिसतो यात माझा काय दोष ? असा सवाल उपस्थित करीत 'सेम टू सेमअसलेल्या पुण्याच्या विजय माने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्याचे विजय माने हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते आणि लोक त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झेरॉक्स कॉपी म्हणून मोठ्या कुतूहलाने पाहत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखाच पेहरावदाढीकपाळावरील गंधडोळ्यावरील चष्मा आणि चेहऱ्यातील साम्य यामुळे विजय माने मोठ्या चर्चेत आहेत . एकसारख्या चेहऱ्याची काही माणसे असू शकतात पण राजकीय व्यक्ती अथवा चित्रपट कलावंत यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी माणसे असतात तेंव्हा त्यांची मोठी चर्चा होत असते. विजय माने यांच्याबाबत देखील असेच झाले पण हे 'सेम टू सेमअसणं त्यांना त्रासदायक होऊ लागले आहे. 



विजय माने यांची मोठी चर्चाही झाली आणि लोकात मोठे कुतूहल देखील आहे पण हेच दिसणं त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडू लागले असल्याचे दिसू लागले आहे. मुख्यमंत्री यांच्यासारखा पेहराव करून गुन्हेगारासोबत फोटो काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अशा काही वर्तानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा धोक्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे असून यामुळे पोलिसांनी विजय माने यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. आपण कुठेही कसल्याही प्रकारे मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला धक्का लावलेला नाही असे विजय माने सांगत आहेत परंतु पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावरही विजय माने पुन्हा चर्चेत आले होते.


पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर माने यांनी आक्षेप घेतला होता आणि आता तर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसतो यात आपली काय चूक आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे. पोलिसांनी केलेला हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. (Chief-minister-Ekanath-Shinde's-duplicate-Vijay-Mane-in-high-court) त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने पोलिसांना नोटीस दिली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे पोलिसांना न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.  


असा मिळतो मान आणि --
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा पेहराव करून माने हे सार्वजनिक कार्यक्रमाला जातात आणि त्याचे फोटोव्हिडीओ व्हायरल करतात असा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो परंतु लोकच व्हायरल करीत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात म्हणून लोकही त्यांना विविध कार्यक्रमाला बोलावतात आणि मुख्यमंत्री समजूनच त्यांना मान सन्मान दिला जातो. लोक कौतुकाने हा व्हिडीओ बनवतात आणि व्हायरल करीत असतात.


समर्थकांत नाराजी !
विजय माने यांचा व्हिडीओ पाहताना ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत असा भास होतो त्यामुळे एकनाथ शिंदे समर्थक नाराज आहेत. विजय माने यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा समर्थकांचा आरोप आहे. यातूनच माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माने यांनी मात्र ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने संबंधितांना नोटिसाही जारी केल्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !