शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांना प्रशासनाने पुन्हा एकदा दणका दिला असून वाळू चोरीसाठी वापरल्या जात असलेल्या होड्या प्रशासनाने फोडून टाकल्या आहेत.
भीमा नदीच्या पात्रात वाळू चोरीचे प्रमुख केंद्र बनले असून प्रशासन सतत कारवाई करीतच आहे आणि वाळू चोर आपली वाळू तस्करी अविरत करीत आहेतच. पोलीस आणि महसूल प्रशासनाने याआधीही अनेकदा कारवाया केल्या आहेत. वाळू चोरीच्या बोटी फोडल्या आहेत, जाळल्या आहेत पण त्याजागी पुन्हा नवी यंत्रणा उभ्री राहते आणि पुन्हा वाळू चोरीचा धंदा तेजीत सुरु होतो. वाळू चोरी करणाऱ्या काही टोळ्या पोलिसांनी हद्दपार देखील केल्या आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सतत छोटे मोठे वाळू चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडत देखील आहेत परंतु वाळू चोरी अद्याप तरी थांबलेली नसून भविष्यात तशी काही आशाही दिसत नाही. प्रशासन मात्र आपल्या पातळीवर कारवाई करीत असून आता पुन्हा एकदा वाळू चोरीच्या होड्या फोडण्यात आल्या आहेत.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक या विरोधात आता महसूल विभागाने एक मोहीम हाती घेतली असून वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या जवळपास अकरा बोटी महसूल विभागाच्या पथकाने फोडल्या आहेत. कटरच्या सहाय्याने त्या होड्या फोडून नष्ट केल्या आहेत. भीमा नदी पात्रातील पंढरपूर, होळे, चिंचोली, इसबावी, भटुंबरे, शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या ठिकाणी या लाकडी होड्याचा वापर करून बेकायदा वाळू उपसा सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. (Boats of sand thieves were broken in Pandharpur taluka) या माहितीच्या आधाराने खास पथके रवाना करण्यात आली. मिळालेल्या माहितीप्रमाणे वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून आले. पथकाने ताबडतोब त्यांच्यावर कारवाई सुरु केली. महसूल पथकाने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !