शोध न्यूज ब्रेकिंग : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या दिंडीत कार घुसल्याने या कारने भाविकांना चिरडले असून यातील सात भाविक मृत्युमुखी पडले आहेत.
पंढरीच्या वारीला येताना आणि जाताना भाविकांच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षात अधिकच वाढले असून आज पुन्हा भाविकांच्या दिंडीत घुसलेल्या एका टाटा नेक्सन कारने मोठा विनाश केला आहे. भाविकांची दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाच्या जवळ आलेली असताना एक भरधाव ट्रक थेट पायी दिंडीत घुसला आहे. (A truck rammed into the devotees, killing seven devotees) कार्तिकी यात्रेचा सोहळा सुरु झाला असून पंढरपूर शहरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि राज्यातून पायी चालत असंख्य दिंड्या पंढरीकडे येत आहेत. अशाच एका दिंडीत हा 'काळ' घुसला आहे.
सांगोला तालुक्यातील जुनोनीजवळ झालेल्या या अपघातात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील भाविक कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी घेवून निघाले होते. हरीनामानाचा जयघोष करीत निघालेल्या या वारकऱ्यांना पाठीमागून येणाऱ्या एक वाहनाने धडक दिली. वेगाने आलेली ही कार सरळ भाविकांच्या दिंडीत घुसली आणि एका क्षणात प्रचंड गोंधळ उडाला. सात भाविकांचा पंढरीच्या वाटेवर अपघाती मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !