BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२२

सोलापूर - पुणे महामार्गावर एस टी - दुचाकी अपघात !

 


शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब येथे एस टी बस आणि दुचाकी यांच्यात मोठा अपघात झाला असून या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अधिक सुरक्षित मानला जात होता परंतु अलीकडे एसटी बसचे सतत अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. आज सोलापूर - पुणे महामार्गावर मोडनिंब येथे काळीज हेलावणारा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या एशियाड बसने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाला. एशियाड एस टी बस (एम एच २० बी एल ३८३३) ही सोलापुराकडून पुण्याच्या दिशेने निघाली होती. ही बस मोडनिंब बसास्थाकाकडे वाळू लागली असतानाच पाठीमागून येणारी दुचाकी जोरदार धडकली. बस वळत असताना मागच्या दिशेने एक होंडा शाईन दुचाकी वेगात आली होती. बस वळत असल्याचे दुचाकी चालकाच्या लक्षात आलेच नाही आणि हा अपघात घडला. 

वेगात येणारी दुचाकी आणि अचानक वळत असलेली एस टी यामुळे दुचाकीच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही आणि दुचाकीने बसच्या पुढच्या बाजूला जोराने धडक दिली. दुचाकी वेगात असल्याने धडक होताच दुचाकीवरील पती पत्नी रस्त्यावर दूर फेकले गेले. यात शशिकांत दशरथ शिंदे (३६) आणि त्यांच्या पत्नी आम्रपाली शशिकांत शिंदे (वय ३२) हे दोघे अत्यंत गंभीर स्वरुपात जखमी झाले. दुचाकीवरून कळंब येथून पुण्याकडे हे पती पत्नी निघाले होते. या दोघांच्याही डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागाला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. 

अपघात होताच परिसरातील नागरिक तसेच महामार्ग पोलीस धावले आणि त्यांनी जखमींना मदत केली. धर्मवीर सामाजिक संस्थेचे भैय्या माने यांच्यासह अनेकांनी धाव घेतली आणि जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. (Accident 0n Solapur - Pune road at Modanimb) अपघातातील बस ही तुळजापूर - मुंबई बस  असून पाठीमागून अत्यंत वेगाने दुचाकी आल्याने आणि आम्ही वळत असल्यामुळे हा अपघात झाल्याने बस चालकाने सांगितले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !