BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ सप्टें, २०२२

ड्रायव्हरशिवाय सुरु झाली गाडी आणि --- (VDO)

 



शोध न्यूज : धावत्या गाडीचे अपघात होतात आणि जीव जातात हे सर्वानाच माहित आहे पण उभी गाडी देखील जीवावर उठू शकते याची साक्ष देणाऱ्या एका घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


रस्त्यावर अत्यंत वेगाने आणि बेफिकीरपणे वाहने धावताना प्रत्येक रस्त्यावर दिसतात. अशा बेफिकीरीने रस्त्यारस्त्यावर अपघात घडताना दिसतात आणि कुणाच्या तरी बेपर्वाईचे बळी रस्त्यावर जातात. चालकाच्या चुकीने दुसऱ्याचे जीव जातात पण उभी आणि बंद असलेली गाडी देखील मालकाच्याच जीवावर बेतू शकते असे उदाहरण आपल्या माहितीत अथवा ऐकीवात नाही. परंतु अशा घटनेचे सीसीटीव्ही चित्रण झाले असून अशाही घटना घडू शकतात हेच या फुटेजने दाखवून दिले आहे. गाडी उभी असली आणि गाडीत कुणीही नसले तरी देखील ती कुणाच्या जीवावर उठू शकते याचे हे बोलके उदाहरण ठरले आहे. त्यामुळे गाडीच्या बाबतीत किती काळजी घ्यावी याचीच शिकवण ही घटना देवून जात आहे. 


रस्त्याच्या बाजूला दुकानांच्या समोर एक गाडी उभी आहे, रस्त्यालगत असलेली दुकाने बंद असून त्यांची बंद शटर स्पष्ट दिसत आहेत. गाडी नादुरुस्त झाली असून एक व्यक्ती ही गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न शांतपणे करीत आहे. कसली घाईगडबड नाही की कसली बेफिकिरी नाही. शांतपणे ही व्यक्ती गाडीचे बोनेट उघडते आणि इंजिनमध्ये काय बिघाड झालाय याचा अंदाज घेवू लागते. त्याचवेळी बंद असलेली गाडी सुरु होते आणि थेट समोर असलेल्या व्यक्तीच्या अंगावर जाऊ लागते. या व्यक्तीला सुरुवातीला तर काहीच लक्षात येत नाही पण जेंव्हा लक्षात येते तेंव्हा त्याला आपला बचाव करण्याची कसलीच संधी मिळत नाही. (
A standing car started without a driver and ---) काही सेकंदात ही गाडी त्या व्यक्तीला चिरडते. दुकानाचे बंद शटर आणि गाडी यांच्यात तो व्यक्ती अडकला जातो. 


ही घटना घडल्यानंतर तेथील काही जणांच्या लक्षात हा प्रकार येतो आणि मग आरडाओरडा आणि धावपळ सुरु होते. ट्वीटर वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून ऑटोमॅटिक गाडी खराब झाली तर त्याच्यासमोर कधीच उभं राहू नका. नाहीतर तुमच्यासोबतही अशीच दुर्घटना होऊ शकते' असा संदेश देण्यात आला आहे. कुणाच्या कल्पनेतही येणार नाही परंतु असा प्रकार घडला असून तो चित्रित झाला आहे म्हणून लोकांचा घटनेवर विश्वास तरी बसला आहे अन्यथा हा प्रकार नेमका कसा घडला याचा काहीच अंदाज आला नसता आणि कुणी सांगितले तर त्यावर कुणी विश्वासही ठेवला नसता. तुम्हीच पहा हा थरारक व्हिडीओ !  व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लाईनवर टच करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !