BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ सप्टें, २०२२

लाचखोर मंडळ अधिकाऱ्यासह कोतवाल गोत्यात !

 




शोध न्यूज : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवळल्या असून पंचवीस हजार रुपयांची लाच या दोघांना भलतीच महागात पडली आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतत यशस्वी कारवाई करीत असले तरी महसूल विभाग काही मागे हटायला तयार नाही. फुकटच्या पैशासाठी चटावलेले लाचखोर सतत सापळ्यात अडकत आहेत, तुरुंगात जाऊन बसत आहेत तरी देखील आणखी लाचखोर पुढे येताना दिसत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मंडळ अधिकारी मदनसिंग सुपडसिंग परदेशी आणि कोतवाल मल्लिनाथ रेवणसिद्ध बाळगी या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवळल्या आहेत. 


वारसाच्या नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार याच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच मागणीची दोन वेळेस पडताळणी काण्यात आली. कोतवाल बाळगी याने या लाचेची मागणी केली आणि त्याची खात्री करून देण्यासाठी मंडल अधिकारी परदेशी याच्याशी फोनवरून बोलणे देखील करून दिले. मंडल अधिकारी परदेशी याने संमती दिल्यामुळे त्याचा लाचाखोरीतील सहभाग पडताळणीत स्पष्ट झाला. 


अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडळ अधिकारी परदेशी आणि कोतवाल बाळगी या दोघानाही ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. (Bribe Case, Circle officers and Kotwals in trouble) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !