BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२२

याला म्हणतात नशीब ! एका रात्रीत रिक्षाचालक बनला कोट्याधिश !

 



शोध न्यूज : कर्ज मिळावं म्हणून बँकेकडे हेलपाटे घालत होता, तोच एका रात्रीत कोट्याधीश झाला आणि जो तो म्हणून लागला, "याला म्हणतात नशीब'! रिक्षाचालकाला तब्बल २५ कोटींची लॉटरी लागली. 


माणसांच्या नशिबात असलेलं कुणी हिसकावून घेत नाही आणि नशिबात असेल तर कधीही कसेही मिळून जाते यावर अनेकांचा ठाम विश्वास आहे. कुणी आपल्या नशिबाला दोष देत आयुष्यभर जगत राहतं तर कुणी आपलं नशीबच फुटकं म्हणत आहे त्या परिस्थितीशी झगडत राहतं ! पण नशीब, नशीब म्हणजे काय ? हे केरळमधील एका रिक्षाचालकाला चांगलं उमगलंय, नव्हे, तो या नशिबाचा अनुभव देखील घेत आहे. 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके' असे नेमके कशाला म्हणायचं ते या रिक्षाचालक अनुप बी श्रीवरहम याला अनुभवायला मिळू लागलं आहे (This is called luck) आणि लोक देखील त्याच्या नशिबाकडे कौतुकाने पाहू लागले आहेत.


अनुप बी श्रीवरहम हा गरीब रिक्षाचालक प्रचंड आर्थिक अडचणीत जगणारा तरुण ! रिक्षा चालवायच्या आधी तो एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत होता. रिक्षा व्यवसायात कुटुंबाचा गाडा हाकता येईना म्हणून त्याने मलेशिया येथे जाऊन आचारी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याला पैसेही लागणार होते. बँकेकडून कर्ज घेवून मलेशियाला जायचे त्याने ठरवले आणि बँकेत हेलपाटे घालू लागला. बँकेने त्याचे कर्ज मंजूरही केले होते. पुढच्या आठवड्यापर्यंत व्हिसा मिळेल अशी त्याला अपेक्षा होती. एवढ्या दूर जाणार म्हणून अनुप बी श्रीवरहमचे कुटुंब देखील अस्वस्थ झाले होते पण एका रात्रीत त्याला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि सगळाच बेत रद्द झाला. 


अनुपकडे लॉटरी तिकीट घेण्यासाठी पैसेही नव्हते, मुलाने जमा केलेल्या पैशातून आपण शनिवारी लॉटरीचे तिकीट खरेदी केल्याचे अनुप सांगतो. शनिवारी त्याने तिकीट खरेदी केले आणि रविवारीच या लॉटरीची सोडत होती. त्याच्या पाचशे रुपयाला खरेदी केलेल्या TJ750605 या क्रमांकाच्या तिकिटाला पहिले बक्षीस लागले आणि एका रात्रीत तो कोट्यधिश झाला. (A rickshaw puller became a millionaire overnight)  केरळच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लॉटरी होती आणि ती अनुपच्या नशिबात आली. पहिले बक्षीस २५ कोटी, दुसरे बक्षीस ५ कोटी आणि तिसरे बक्षीस म्हणून दहा जणांना प्रत्येकी एक कोटी असे या लॉटरीचे स्वरूप होते.

 

या लॉटरीने अनुपचे अवघे आयुष्यच बदलून गेले आहे. तीन लाख कर्ज मिळावे म्हणून त्याने बँकेकडे अर्ज केलेला होता आणि आता त्यालाच २५ कोटींचे बक्षीस एका रात्रीत लागले. कर वजा जाता अनुपला आता १५.७५ कोटी रुपये मिळणार आहेत. आता आपल्याला कर्ज नको आहे असे त्याने बँकेलाही सांगून टाकले आहे. त्याच्या नशिबाचा आणखी एक योगायोग लॉटरी तिकीट विक्रेत्याने सांगितला आहे. भगवती एजन्सीमधून त्याने हे तिकीट घेतले होते आणि त्याने घेतलेले पहिले तिकीट त्याला आवडले नाही. त्याने पहिले तिकीट आवडले नसल्याने दुसरे तिकीट घेतले होते आणि त्याच दुसऱ्या तिकिटाने त्याला कोट्याधिश बनवले.


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !