BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० सप्टें, २०२२

लंपी व्हायरस पाकिस्तानातून आल्याचा रामदेव बाबांचा दावा !

 



शोध न्यूज : जनावरांना त्रासदायक ठरत असलेला लम्पी व्हायरस हा पाकिस्तानमधून आल्याची शंका योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली असून त्यांनी चौकशीचीही मागणी केली आहे. 


अवघ्या जगाला छळलेल्या कोरोना व्हायरसचा जन्म चीनमध्ये झाला असून चीनने तो जाणीवपूर्वक जगभरात पसरविला असल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रासह देशभरात लम्पी ची लागण जनावरांना होत असून यातून जनावरांच्या जीवितालाही धोका होऊ लागला आहे. पशुधन वाचविण्याचे एक मोठे आव्हान शेतकरी आणि सरकार यांच्यापुढे उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत योगगुरु रामदेव बाबा यांनी पाकिस्तानबद्धल शंका उपस्थित केली आहे. या शंकेनेही खळबळ उडाली आहे. 


देशातील अनेक राज्यात लम्पी व्हायरस वेगाने पसरू लागला आहे. यात उत्तराखंडचा देखील समावेश आहे. या व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू होत आहेत. (Ramdev Baba claims that lumpy virus came from Pakistan) हा व्हायरस मानवनिर्मित असून पाकिस्तानातून भारतात आला आहे असा दावा करून रामदेवबाबा यांनी या व्हायरसची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !