BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० सप्टें, २०२२

आठ महिन्याच्या चिमुकल्याने गिळले नेलकटर आणि ----

 


शोध न्यूज : अवघ्या आठ महिन्याच्या बाळाने नेल कटर गिळले आणि ते त्याच्या गळ्यात अकडून बसले, त्यानंतर घामाघूम झालेल्या पालकांनी डॉक्टरकडे धावा घेतली आणि ते बाहेर काढण्यात यश आले. 


लहान मुले खेळत असताना पालकांचे लक्ष असायला हवे असे नेहमी सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात पालकांचे लक्ष बालकावर रहात नाही आणि मग अनेकदा मोठे संकट ओढवले जात असते. मुलांच्या अन्ननलिकेत, घशात, पोटात अशा कित्येक धक्कादायक वस्तू आजवर आढळल्या आहेत. पालकांच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे लहान मुलांचे प्राण संकटात येतात आणि नंतर धावाधाव केली जाते. नंतर होणाऱ्या त्रासापेक्षा आधीच आणि वेळीच काळजी घेतली तर असे प्रसंग टाळता येतात पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. नाशिक येथे तर कमालीचे संकट लहान बाळावर ओढवले गेले पण सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले आणि आठ महिन्याच्या बाळाला होऊ घातलेला धोका टळला. 


आपले काम उरकण्यासाठी आई बाळाच्या समोर हातात येईल ती वस्तू टाकते आणि बाळ त्याच्याकडे पहात खेळत बसते. यातून काय संकट जन्म घेईल याची कल्पनाही आईला नसते. नाशिक येथे आठ महिन्याच्या बाळाच्या हाताला नेलकटर लागले आणि त्याने ते तोंडात घातले. तोंडात गेल्यानंतर ते या बाळाच्या घशात पोहोचले. हा प्रकार जेंव्हा आई वडिलांच्या निदर्शनास आला तेंव्हा त्यांच्या काळजात धस्स झाले पण त्यांना काहीच करता येत नव्हते. एवढे मोठे नेल कटर आठ महिन्याच्या बाळाच्या घशात गेल्यावर बाळाची काय अवस्था झाली असेल याची सहज कल्पना येवू शकते.  बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे आईच्या लक्षात आले आणि आईने निरखून तपासले असता बाळाने नेलकटर गिळले असल्याचे आणि ते घशात अडकले असल्याचे लक्षात आले.


हा प्रकार निदर्शनाला आल्यावर घामाने डबडबून गेलेल्या आईला सुरुवातीला तर काय करावे हेच समजेनासे झाले. धावत पळत नाशिकच्या आडगाव परीसातील वैद्यकीय महाविद्यालयात बाळाला नेण्यात आले, तेथे दाखल करताच बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नेलकटर बाहेर काढण्यात आले. नेलकटर जेंव्हा बाहेर निघाले तेंव्हा बाळाचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला आणि आई वडिलांनी सुटकेचा निश्वास घेतला. यासाठी डॉक्टरांना प्रचंड प्रयत्न करावे लागले परंतु अखेर त्यांना यश आले. (Nail cutter in the throat of an eight-month-old baby) बाळाची प्रकृती देखील उत्तम आहे पण बाळाची काळजी किती बारकाने घेतली जावी हेच या घटनेने अधोरेखित केले आहे. या घटनेतून प्रत्येक आई वडिलांनी लहान बाळांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे हेच या घटनेने सांगितले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !