BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२२

पंढरपूर - स्वारगेट शिवशाही बसला मोठा अपघात !

 



शोध न्यूज : मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर - स्वारगेट शिवशाही बसला पुणे मार्गावर अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.


सुरक्षित प्रवास मानला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे देखील अपघात होऊ लागले असून शिवशाही बसला तर विविध प्रकारे अपघात होत आहेत त्यामुळे अधिकची चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पंढरपूर येथील भीमा नदीच्या पुलावर नुकताच एका एस टी बसला अपघात झाला होता आणि सुदैवाने फार मोठा अनर्थ टळला होता. या अपघाताची चर्चा सुरु असतानाच पुन्हा पंढरपूर - पुणे शिवशाही बसला पुण्याजवळ मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा  मृत्यू तर सहा जखमी झाले आहेत. एका कंटेनर आणि शिवशाही बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात मध्यरात्रीच्य असुमारास झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उरुळी देवाची परिसरात हा अपघात झाला आहे. 


पंढरपूर - स्वारगेट ही शिवशाही बस पुणे -सासवड रस्त्यावरील उरुळी फाट्याजवळ पोहोचली असता येथील एका गोदामांतून माल घेवून एक कंटेनर निघाला होता. याच वेळी शिवशाही बस (MH14 GO 3104)पुण्याच्या दिशेने वेगाने निघालेली होती. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस सरळ कंटेनरवर जाऊन आदळली. पंढरपूरहुन्न पुण्याकडे निघालेली ही बस अत्यंत वेगात होती आणि वेगात कंटेनरला धडक दिल्याने बसच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात प्रवासी झाखामी झाले आहेत . अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.


रस्त्यावरच हा अपगःत झाल्याने अपघातग्रस्त वाहनांमुळे रस्ता अडला गेला होता. माल घेवून निघालेला कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याने रस्त्यावर एकच गोंधळ उडाला तर बसमधील (Shivshahi bus) प्रवासी घाबरून गेले होते. बहुसंख्य प्रवासी अर्धवट झोपेत होते आणि अचानक हा मोठ्या स्वरूपाचा अपघात झाला त्यामुळे प्रवाशांचाही गोंधळ उडाला. नागरिकांनी शिवशाही बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. या जखमीत कंटेनर चालकाचाही समावेश आहे. शिवशाही बसचे नुकसान झालेच आहे पण कंटेनरचे देखील या अपघाताने मोठे  नुकसान झाले आहे. 


शिवशाही बसमध्ये चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूला एक प्रवासी जखमी अवस्थेत अडकून पडला होता. अग्निशमन उपकरण फायर एकसचा वापर करीत पाच मितीनीत या व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले. (Pandharpur - Swargate Shivshahi bus major accident)दोन्ही वाहनांमुळे वाहतूक ठप्प झाली होती परंतु नंतर क्रेनच्या मदतीने ही वाहने बाजूला करण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत झाली. अपघात नेमका कशामुळे झाला याचे स्पष्ट कारण समोर आले नाही परंतु अपघाताची भीषणता मात्र  मोठी होती.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !