BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२२

भीमा नदीकाठी पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा !

 


शोध न्यूज : उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणखी वाढविला असल्याने भीमा नदीची पातळी आणखी वाढणार असून नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . 


सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित पाउस नसला तरी पुणे परिसरात होत असलेल्या सततच्या पावसामुळे उजनी आणि इतर धरणांची पातळी देखील कायम वाढलेली आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडावे लागत आहे. गेल्या काही दिवसापासून उजनी धरणातून पाणी सोडले जात आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहून उजनी धरणाचा विसर्ग कमी अधिक करण्यात येत आहे. उजनी धरणांतून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पुराची परिस्थिती निर्माण होत आहे. उजनीच्या पाण्याने भीमा नदी वाहात असताना आता पुन्हा एकदा उजनी धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.


उजनी धरण १०८.६५ टक्के  टक्के उपयुक्त पातळीत भरलेले आहे त्यामुळे   धरणातून ३० हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात होते त्यात वाढ करण्यात आली आणि हा विसर्ग ४० हजार करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता या विसर्गात पुन्हा वाढ करून तो ५० हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. वीर धरणातून २५ हजार १८५ क्युसेक्स पाणी भीमा नदीत येत आहे. या पाण्यामुळे भीमा नदीची पातळी वाढती राहणार आहे. दौंड येथील विसर्ग ३५ हजार ७४६ क्युसेक्स असून हा विसर्ग सतत कमी अधिक होताना दिसत आहे.  त्यानुसार उजनी धरणातून सोडल्या जात असलेल्या पाण्याच्या विसर्गात कमी अधिक करण्यात येत आहे.


आज उजनी धरणातील वाढविलेल्या विसर्गामुळे आणि वीर धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीची पातळी आणखी वाढणार असून त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Increased discharge from Ujani dam, warning alert)  पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस वाढत राहिला तर धरणाचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.


वरच्या धरणातून पाणी 

उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.  भीमा नीरा खोऱ्यात चांगला पाऊस होत आहे त्यामुळे विविध धरणातून पाणी सोडण्यात येवू लागले आहे. त्याचा परिणाम उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ होण्यात होणार आहे. घोड धरणातून ११ हजार, मुळशी १३ हजार २००, खडकवासला धरणातून ६ हजार ८४८ क्युसेक्स, कालमोडी ७२०, चासकमान २ हजार ७०, वडिवळे धरणातून २७५ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.   


बंधारे पाण्याखाली जाणार  

उजनी धरणातील ५० हजार आणि वीर धरणातील २५ हजार क्युसेक्स विसर्गामुळे भीमा नदीला पुन्हा एकदा पूर येणार असून नदीवर असणारे बंधारे पाण्याखाली जाणार आहेत तर पंढरपूर येथील जुना दगडी पूल आणखी एकदा पाण्याखाली जाणार आहे.  पाण्याची वाढती पातळी लक्षात घेवून नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !