BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ सप्टें, २०२२

पोलिसांनी काढली 'बाराती' ची वरात !

 



शोध न्यूज : अन्न व औषध प्रशासनाला गोपनीय माहिती मिळाली आणि मग 'बाराती' ची वरात यावली फाट्यावरून पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. अवैध पानमसाल्यासह तब्बल तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


वाहतूक आणि विक्रीस मनाई असलेला गुटखा, अवैध पानमसाला असे पदार्थ कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येत असल्याच्या अनेक घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. मंगळवेढा, सांगोला, पंढरपूरमार्गे हा गुटखा, पान मसाला पुण्याच्या दिशेने जाताना पोलिसांनी अनेकदा पकडला आहे. आता मोहोळ पोलिसांनी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारवाई करून तीस लाख रुपये किमतीचा  माल ताब्यात घेतला आहे. आयशर टेंपो आणि अवैध पानमसाला असा तीस लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. 


बिदर येथून अवैध पान मसाला घेवून आयशर टेम्पो (केए ४१ /ए ४१२२) हा शिरूरकडे निघाला होता परंतु याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ आणि प्रशांत कुचेकर हे मोहोळ तालुक्यातील यावली फाटा येथे येऊन थांबले. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा टेम्पो येताच त्यांनी तो थांबवला आणि चौकशी केली. नंतर त्यांनी या टेंपोची वरात मोहोळ पोलीस ठाण्यापर्यंत काढली. (Illegal Panmasala seized by police, action taken by Food and Drug Administration) पोलीस ठाण्यात टेंपो आणल्यानंतर आतील मालाची तपासणी केली असता पांढऱ्या रंगाची पन्नास पोती आढळून आली. 


सदर पोती उघडून पाहिली असता त्यात कसलीतरी पाकिटे आढळून आली. ही पाकिटे उघडून पाहिली तेंव्हा त्यात तंबाखू मिश्रित सुगंधी पान मसाला असल्याचे दिसून आले. 'बाराती' पान मसाल्याची पंधरा हजार पाकिटे, बाराती सुगंधी मसाला असलेली पंधरा हजार पाकिटे या तपासणीत आढळून आली. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती नंदिनी हिरेमठ यांनी पोलिसात दिली. 'बाराती' पान मसाला आणि आयशर टेंपो असा तीस लाखांचा माल मोहोळ पोलिसांनी जप्त केला. पुणे जिल्ह्यातील शिरुरू येथील शोएब सय्यद समशुद्दीन रा गंगान हल्ली बेंगलोर, इरशाद अहमद खान आणि पुणे येथील  शाकीर शेख व ऋषभ भटोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !