BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२२

भीमा नदीची पुरपरिस्थिती आता अटळ, लाखाहून अधिक विसर्ग !

 



शोध न्यूज : भीमा नदीची पूरपरिस्थिती आता अटळ असून उजनी धरणातून आणखी विसर्ग वाढविल्याने भीमा नदीत एका लाखाहून अधिक विसर्ग येत आहे त्यामुळे नदीकाठा वरील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. 


पुणे परिसरातील पावसाचा मोठा परिणाम भीमा नदीच्या पाण्यावर होताना दिसत असून त्यामुळे पुणे परिसरातील विविध धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरणात येणारे पाणीही वाढत असून उजनी धरण आधीच भरलेले आहे. त्यामुळे उजनी धरणातून विसर्ग सोडला जात असतानाच आता तो मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. उजनी धरणातून आज दुपारी विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला असून आता तो ८० हजार क्युसेक्स  करण्यात आला आहे.  उजनी धरणातून आज सकाळपासूनच टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे. 


दौंड येथे उजनी धरणात येणारे पाणी हे ३६ हजार २७५ क्युसेक्स असून यात आणखी वाढ होणार आहे. वरच्या धरणातून वाढविलेला विसर्ग दौंड येथे पोहोचेल त्यावेळी हा विसर्ग अधिक वाढलेला दिसेल. त्याचा विचार करून धरण प्रशासनाने उजनी धरणाचा विसर्ग वाढविला आहे. दुपारी दोन वाजता तो ८० हजार क्युसेक्स करण्यात आला असून आवक लक्षात घेवून तो पुन्हा वाढविण्याबाबत निर्णय होऊ शकतो. खडकवासला धरणातून ३० हजार ६७७ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. चासकमान प्रकल्पातून ९ हजार ३७५ क्युसेक्स तर मुळशी धरणातून  २६ हजार ४०० क्युसेक्सचा विसर्ग आहे. 


वीर धरणातून येणारा ३४ हजार क्युसेक्सचा विसर्ग आणि उजनीतून सोडलेला ८० हजाराचा विसर्ग हे पाणी नीरा नृसिन्हपूर येथे एकत्र येवून तेथून पुढील भीमा नदीत एक लाखाहून अधिकच विसर्ग वाहणार आहे त्यामुळे भीमा नदीला पुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. भीमा नदीची पातळी सतत वाढत असून ती आणखी वाढणार आहे.  शिवाय वरच्या धरणातून येत असलेले पाणी उजनी धरणात मोठ्या प्रमाणात येवू लागल्यामुळे विसर्गात सतत वाढ होण्याची शक्यता आहे. 


उजनी आणि वीर धरणातील  विसर्गामुळे भीमा नदीला पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होत असून नदीवर असणारे बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. (Discharge from Ujani Dam was further increased, Bhima river flood situation) भीमा नदी पातळीत मोठी वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !