BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२२

एस टी च्या फाटलेल्या पत्र्याने छाटले दोघांचे हात !

Title of the document

 



शोध न्यूज : रस्त्याने जाणाऱ्या एस टी ने धडक दिली नाही पण पोलीस प्रवेश परीक्षेचा सराव करणाऱ्या दोघांचे हात मात्र तुटून पडले असल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 


अपघात नेहमीच होतात पण कधी कधी अगदीच विचित्र अपघात होत असतात. आपली काही चूक असो की नसो, परिणाम भोगावेच लागतात. असाच एक प्रकार घडला असून एस टी चालकांच्या काहीशा बेपर्वाईमुळे पोलीस प्रवेश परीक्षेचा सराव करणाऱ्या दोन तरुणांचे हात छाटले गेले आणि यामुळे गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याचेही पाहायला मिळाले. बुलढाण्यात ही विचित्र घटना घडली असून दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मलकापूर - पिंपळगाव मार्गावर एका एस टी च्या फाटलेल्या पत्र्यामुळे ही वेगळीच आणि तितकीच विचित्र घटना घडली. पोलिसांनी पंचनामा केला असून तरुणाच्या प्रकृतीबाबत मात्र चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 


भल्या सकाळी अनेक तरुण शहरालगतच्या रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी जाताना सगळ्याच शहरात पहायला मिळते. अशाच प्रकारे विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील हे दोन तरुण व्यायामासाठी म्हणून बाहेर पडले होते. पोलीस प्रवेश परीक्षेचा ते सराव करीत होते. पोलीस खात्यात सेवा करण्याची स्वप्ने उराशी बाळगून ते शारीरिक व्यायाम करीत असायचे. पोलिसांच्या भरतीत पात्र ठरावे यासाठी त्यांचे अखंड परिश्रम सुरु होते. आज सकाळी ते मलकापूर - पिंपळगाव रस्त्यावर व्यायामासाठी गेले असताना त्यांच्याजवळून राज्य परिवहन महामंडळाची एक बस धावत गेली. आणि याच वेळी फार मोठा अनर्थ घडला. 


राज्य परिवहन महामंडळाची बस त्यांच्या जवळून गेली परंतु या बसचा पत्रा फाटलेल्या अवस्थेत होता. मागच्या बाजूचा हा पत्रा तुटून बाहेरच्या बाजूला आला होता. व्यायाम करीत असलेल्या विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील यांना याची जाणीवही नव्हती. या फाटलेल्या आणि बाहेरच्या बाजूला आलेल्या पत्र्याने या दोन्ही तरुणांचे हात अक्षरश: कलम केले. त्यांचे दोन्ही हात तुटून पडले तसेच त्यांना डोक्याला तसेच इतरत्र देखील जोरदार मार लागला. बस चालकाने बस थांबवत या दोन्ही जखमींना मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर बस घेवून चालक थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तेथे त्याने या घटनेची माहिती दिली.  


या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यानी मलकापूर बस आगारात जाऊन आगर व्यवस्थापक कार्यालयावर हल्लाबोल केला. दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृती पाहता त्यांना जळगाव रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दोन्ही तरुणांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Bus accident, broken sheet cuts hands of youth) हात कापले गेल्याचे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मलकापूर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना पुन्हा जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.


दोन्ही जखमी तरुणांच्या उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे परंतु या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. पत्रा फाटलेली बस धामणगाव पोलीस स्थानकात थांबविण्यात आली असून या बसचा चालक देखील पोलीस ठाण्यातच आहे. सदर बसचा पत्रा फाटलेला असताना ही बस आगारातून बाहेर कशी काढण्यात आली ? असा सवाल गावकरी उपस्थित करू लागले आहेत. बसचा पत्रा फाटून बाहेर आल्याचे आगारात संबंधित कुणाच्याच कसे लक्षात आले नाही? चालकाने देखील अशा अवस्थेतील बस स्थानकाच्या बाहेर कशी नेली ? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार होऊ लागला आहे.  

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !