BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यात प्राणघातक तलवार हल्ला !

 



शोध न्यूज : तलवारीने हल्ला करून पंढरपूर तालुक्यात एकावर प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


ग्रामीण भागात विविध कारणावरून आपसात वादंग होत असतात परंतु तलवारीने कुणी कुणावर हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या घटना पंढरपूर तालुक्यात दुर्मिळ आहेत. पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे मात्र ही धक्कादायक घटना घडली आहे. शिरढोण गावठाण परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी याबाबत संबंधित संशयित आरोपी सागर भीमराव शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरढोण येथेईल परमेश्वर भूसनर हे आपली पत्नी सुवर्णा परमेश्वर भूसनर यांच्यासोबत दुचाकीवरून गावठाण परिसरात गेले होते. गावठाण येथे त्यांचे घर असून हे घर स्वच्छ करण्यासाठी म्हणून ते गेले असता त्या ठिकाणी ही घटना घडली. भूसनर पती पत्नी तेथे गेले असता तेथे शिरढोण येथील सागर भीमराव शिंदे हा आला आणि ही घटना घडली.

 

सागर शिंदे याने तेथे येवून दुचाकी लावण्याच्या कारणावरून परमेश्वर भूसनर यांना शिवीगाळ करू लागला. 'तुला खल्लास करतो' असे म्हणत तो शिवीगाळ करू लागला आणि त्यानंतर तो आपल्या घरात गेला. घरातून एक लोखंडी तलवार घेवून आला आणि त्याने भूसनर यांच्यावर हल्ला चढवला. भूसनर यांच्यावर तलवारीने हल्ला केला यात परमेश्वर भूसनर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या बोटावर तलवारीचा वार झाला आहे. तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे परमेश्वर भूसनर यांनी म्हटले आहे. जखमी भूसनर यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संशयित आरोपी सागर भीमराव शिंदे याचा शोध सुरु केला आहे. हल्ला केल्यानंतर तो पसार झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक नेमण्यात आले आहे. सागर शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्याबाबतच्या सूचना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिल्या असून पोलीस आरोपीच्या शोधला लागले आहेत. (Deadly attack with sword in Pandharpur taluka) या घटनेने शिरढोण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामीण भागातही किरकोळ कारणावरून तलवारीने हल्ले होऊ लागले आहेत त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !