BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२२

संतापलेल्या उंदराला घाबरून साप गेला पळून ! VDO




शोध न्यूज : आपली भूक भागविण्यासाठी साप उंदरांच्या शोधात असतो पण संतापलेल्या एका उंदराला पाहून सापालाच आपला जीव वाचवत पळून जावे लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.


जगात अनेक विस्मयकारक घटना घडत असतात पण त्या सर्वांपर्यंत पोहोचत नव्हत्या. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यामुळे आता कुठेही काही घडले तर सर्वत्र पोहोचू लागले आहे. एकाद्या नवलाईची बातमी आली तर काही वर्षांपूर्वी त्यावर विश्वास ठेवला जात नसायचा ! 'असे कुठे घडते काय'? असा सवाल विचारून खिल्ली उडवली जायची. आता मात्र कधीही न पायहाला मिळणाऱ्या घटनांचा थेट व्हिडीओ पहायला मिळू लागला आहे आणि अशा घटना पाहून लोक थक्क होत आहेत. चोरांनी हातचलाखी करून केलेली चोरी इथपासून रस्त्यावर झालेला अपघात देखील आता चित्रित होत आहे आणि वैशिष्ठ्यपूर्ण घटना व्हायरल देखील होत आहेत. 

 
असाच एक व्हिडीओ प्रचंड गाजत असून या व्हिडिओत उंदरापासून वाचण्यासाठी साप जिवाच्या आकांताने पळून जाताना दिसत आहे. उंदीर म्हणजे सापाचे भूक भागवायचे भक्ष्य आहे.  पिकांची नासाडी करणारे उंदीर साप खाऊन टाकतो म्हणून तर सापाला शेतकऱ्याचे मित्र म्हटले जाते. सापाचा सुगावा लागला की उंदीर जीव मुठीत धरून पळू लागतो किंवा कुठेतरी लपून बसतो. सापाला पाहिलं तरी उंदीर थरथर कापतो. पण हाच उंदीर सापावर चाल करून जातो आणि साप त्याला घाबरून पळून जातो असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु याचा व्हिडीओ बनल्यामुळे अविश्वासाचा प्रश्नच उरत नाही. अत्यंत कुतूहलाने हा व्हिडीओ पहिला जात आहे. 


कुठलीही आई आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करीत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या क्षमतेच्या दुप्पट शक्ती असलेल्याशी सुद्धा लढायला तयार होत असते. या व्हिडीओत देखील असाच प्रकार पाहायला मिळतो. एका सापाने उंदराचे पिल्लू पकडले आहे. हे लहानगे पिल्लू गट्टम करायला सापाला कितीसा वेळ लागणार आहे ? पण सापाने हे पिल्लू फस्त करण्याच्या आधीच उंदराने सापावर चाल केली. उंदराच्या पिल्लाच्या आईने मोठे धाडस करून आपल्या पिल्लाच्या संकटात धाव घेतली. सापाच्या तोंडातून पिल्लाला सोडवायचे कसे हा प्रश्न उंदराला पडला आणि मग उंदराने सापाशीच युद्ध सुरु केले. तोंडात उंदराचे पिल्लू पकडलेला साप उंदराच्या आक्रमणाला घाबरला आणि सैरावैरा पळू लागला.

 
काही करून आपल्या पिल्लाला वाचवायचेच असा निर्धार केलेल्या उंदराने सापावर चाल केली. साप घाबरून पळत होता पण उंदीर त्याच्या शेपटीला पकडून मागे ओढण्याचा प्रयत्न करीत राहिला. उंदीर सापाच्या शेपटीला पुन्हा पुन्हा चावत राहिला. सापही तोंडातला उंदीर सोडायला तयार नव्हता आणि उंदीर देखील मागे हटायला तयार नव्हता. साप तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत राहिला पण उंदीर त्याला पळून जाऊही देत नव्हता. अखेर सापाने तोंडातील उंदराचे पिल्लू सोडून दिले आणि तेथून पळ काढला. उंदराचे पिल्लू सोडले असले तरी उंदीर एवढा चिडलेला होता की पिल्लू सोडले तरी त्याने सापाचा पाठलाग दिला. अखेर साप पळून जाण्यात यशस्वी झाला आणि उंदराचे पिल्लू देखील सुखरूप आपल्या आईसोबत गेले. 


साप आणि उंदीर यांच्यातील हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला असून तेवढाच तो व्हायरल देखील होत आहे.(A battle between an angry rat and a snake) साप आणि मुंगूस यांच्यातील युद्ध अनेकदा पहिले असेल पण साप आणि उंदीर यांच्यातील हे अनोखे, दुर्मिळ युद्ध तुम्हीही पहाच ! 



  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !