BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ सप्टें, २०२२

तुळजाभवानी ज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला !

 


शोध न्यूज : नवरात्रोत्सवासाठी आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला निघालेल्या दोन तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून या घटनेने नवरात्रोत्सव आणि दसरा सणाचा आनंदही काळवंडून गेला आहे.


घटस्थापना होण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीची ज्योत आणण्याची गावोगाव परंपरा आहे. पायी चालत धावत जात गावागावातील तरुण आई तुळजाभवानीची ज्योत आपल्या गावात घेवून येतात आणि त्यानंतर नवरात्रीचा उत्सव साजरा करतात. गावातून अनेक तरुण मिळून जातात आणि रस्त्याने धावत ही ज्योत आणण्याची परंपरा आहे. रस्त्यावरून जाताना भरधाव वेगाने जाणारी वाहने असतात त्यामुळे अपघाताचा धोका असतो. ज्योत घेवून जाणारे तरुण पाहून बहुतेक वाहनचालक आपली वाहने हळू घेतात पण अलीकडे वाहनांचा वेग आणि चालकाची मानसिकता बदलली असल्याचे दिसून येते. बाजूने अंत्ययात्रा निघाली तरीही वाहनाचा वेग जरासाही कमी न करणारे अनेक मस्तवाल चालकही पाहायला मिळत असतात. 


परंपरेप्रमाणे विविध नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील उपसरपंच अमोल सुरेश खिलारे (वय ३५) आणि  प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० वर्षीय आरोग्य सेवक महेश भास्कर भोसले हे देखील तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी निघाले होते. दुर्दैवाने तुळजापूर येथे पोहोचण्याच्या आधीच त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली आणि या अपघातात या दोघांचाही मृत्यू झाला. मोठ्या भक्तिभावाने तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर काळाचा घाला घातला गेला आणि आई तुळजाभवानीची ज्योत आणण्याच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली.


गावातील नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत आणण्याची पूर्वीपासूनची प्रथा आहे. त्यामुळे गावातील ५० तरुण भाविक तुळजापूरच्या दिशेने निघाले होते. हे तरुण येरमाळा येथे पोहोचले तेंव्हा रात्र झाली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने या तरुणांच्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघात करून ते वाहन पळून देखील गेले. या अपघातात मात्र सदर दोन तरुण भाविकांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक गावातील उपसरपंच तर दुसरा आरोग्य सेवक होता. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही परंतु गावावर मोठी शोकाकुल परिस्थिती ओढवली आहे. गावकरी मोठ्या उत्साहात नवरात्र आणि दसरा साजरा करण्याची तयारी करीत होते आणि त्याचवेळी या दुर्घटनेची बातमी गावात धडकली.


मोठ्या श्रद्धेने तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी निघालेल्या उपसरपंच आणि आरोग्य सेवकाचा वाटेत मृत्यू झाल्याची बातमी गावात येताच गावकरी एकत्र जमा झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव आणि दु:ख दिसत होते. सणावाराचा आनंद मावळला होता आणि ती जागा शोकाने घेतली. (Accident of youth while going to bring flame to Tuljabhavani) तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते. ऐन सणासुदीच्या काळात गावाला या दुर्घटनेचा सामना करण्याची वेळ आली आहे. 


पाच मजूर ठार !
नांदेड - किनवट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुसऱ्या  एका अपघातात ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. सोनारी फाटा येथे ट्रक आणि आयशर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !