BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ सप्टें, २०२२

साडी घालून आले, लोकांनी बेदम चोपले !



शोध न्यूज : साड्या घालून आलेले चोर भरदिवसा घरात घुसले पण नागरिकांनी त्यांना बेदम चोपले ! एका मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या ठिकाणी दमदाटी केल्याने त्यांचे अक्षरश: वस्त्रहरण झाल्याचे पाहायला मिळाले.


चोरी करण्यासाठी चोर रोज नवे फंडे अवलंबतात आणि अनेकदा त्यात यशस्वीही होतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे बहाणे करतात आणि त्याद्वारे फसवणूक करीत हात साफ करतात. तीन चोरट्यांनी आज एक वेगळाच प्रकार केला पण त्यांचे बिंग फुटले आणि बेदम मार खाण्याची वेळ आली. जळगाव येथील वाटिका आश्रम परिसरात भर दिवसा हा अजब प्रकार घडला आहे. साडी परिधान करून तिघे तरुण भीक मागत फिरत होते. त्यांनी साड्या घातल्या असल्यामुळे लोकांना या महिलाच वाटत होत्या. भीक मागत मागत हे तिघे एका घराजवळ आले आणि त्यांना घरात एक मुलगी एकटीच असल्याचे दिसले. भीक मागता मागता चोरी करण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांना दिसले. 


आजूबाजूला कोणी नाही आणि मुलगी एकटीच घरात आहे हे पाहून हे तिघे तिच्या जवळ गेले आणि त्यांच्यापैकी एकाने या मुलीचा गळा दाबला आणि तिला घरातून पैसे आणण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. तिच्या आवाजामुळे कुणी येईल या भीतीने ते तेथून पळाले. तेथून दुसऱ्या परिसरात गेल्यावर देखील त्यांनी असाच काहीसा प्रकार केला. तेथे एका घरात हे तिघेही घुसले आणि पैशाची मागणी केली. त्या घरातील एकाने त्यांना काही पैसे देण्यासाठी पाकीट काढताच त्यांच्या हातातील पाकीट हिसकावून घेतले आणि त्यातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले. घरात घुसून, दमदाटी करून बळजबरीने पैसे काढून घेण्याचा हा प्रकार आजूबाजूच्या लोकांनाही समजला. लोकांनी एकत्र येवून साडीतल्या या तिघा पुरुष चोरांना बेदम बदडले आणि पोलिसांच्या हवाली केले. 


मुले पळवणारी टोळी समजून बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साडी परिधान केलेले पुरुष अशा संशयास्पद रीतीने गावात भीक मागण्याचे नाटक करीत फिरत होते. हे तिघे मुले पळवणारे लोक आहेत असा अनेकांचा गैरसमज झाला. तशाच प्रकारचा संशय अनेकांना आल्याने वेगळाच गोंधळ झाला. (Stealing, brutally beaten by wearing a saree) लोकांनी यांना बदडून काढून पोलिसांच्या हवाली केले पण तक्रार द्यायला कुणीच पुढे आले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करायचा तरी कसा ? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. भीक मागत अशा प्रकारची चोरी मात्र या तिघांना भलतीच महागात पडली आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !