BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑग, २०२२

राज्यातील 'या' निवडणुकाची प्रक्रिया स्थगित !

 



मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्यात आली असून आता या निवडणुका होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे.


राज्यातील ग्रामपंचायतींच्या रखडलेल्या निवडणुका पार पडल्या आणि आज मतमोजणी होऊन त्याचे निकाल देखील लागले आहेत. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका यांच्या निवडणुकीची प्रतीक्षा होती आणि ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले जोरदार तयारीला देखील लागलेले आहेत. प्रभाग रचनेवरून ही निवडणूक पुन्हा चर्चेत आली होती. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत पुन्हा बदल केला तसेच जिल्हा परिषदेत वाढीव गट आणि गण यांच्यातही बदल केला. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार असल्याने काही महिने जाणार आहेत.  निवडणूक आयोगाने आज या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली आहे. 


राज्यातील २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेलाच आज ही स्थगिती देण्यात आली आहे. वास्तविक या निवडणुकीसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. पंचवीस जिल्हा परिषदासह २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना आज जाहीर केली जाणार होती परंतु जाहीर करण्यात येणार असलेली मतदार यादीची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना तशा सूचना देखील दिल्या आहेत.  महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात देखील स्थगिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय शिंदे सरकारने बदलला त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Zilla Parishad, Panchayat Samiti elections process suspended) हा निर्णय आज एका परिपत्रकाद्वारे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !