BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ सप्टें, २०२२

पोलीस अधीक्षक बंगल्यातील चंदनाच्या झाडांची चोरी !

प्रातिनिधिक चिंत्र 



Title of the document


शोध न्यूज : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातील चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेली असून चंदन चोरांची मजल थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बंगल्यापर्यंत गेल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

चंदनचोरांमुळे चंदनाची झाडे ही सतत असुरक्षित असतात, जेथे कुठे अशी झाडे दिसतील तेथे चंदनचोर पोहोचतात आणि कधी ही झाडे कापून नेली जातात ते कळूही दिले जात नाही. चंदनाचे झाड कापून नेल्यावरच त्याची माहिती होते एवढ्या खुबीने चंदनाची चोरी होत असते. त्यामुळे चंदनाचे झाड सदैव असुरक्षित असते. पोलीस सदैव चंदनचोरांच्या पाठीमागे असतात पण आता चोरांनी भलतेच धाडस केल्याचे समोर आले आहे. थेट पोलीस अधीक्षकांच्याच बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. पोलिसांच्या घरात घुसून चोर चोरी करतात याची काही उदाहरणे घडली आहेत पण चंदनाच्या चोरीसाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बंगला देखील सोडला नसल्याचे समोर आले आहे. 


सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सोलापूर येथील 'निलगिरी' बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्याचे अजब धाडस अज्ञात चोरट्यांनी केले आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद देखील देण्यात आली आहे. फिर्यादी पोलीस कर्मचारी अभिजित शिंदे हे निलगिरी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस लाईटचे बटन बंद करण्यासाठी गेले असता त्यांना लॉनमध्ये असलेले  चंदनाचे मोठे झाड कापलेले असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता झाड कापलेल्या अवस्थेत दिसले. या झाडाचा बुंधा मात्र जागेवर दिसून आला नाही. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंगल्यातील अन्य चंदनाच्या झाडांची पाहाणी केली असता गेस्ट हाऊसच्या बाजूचे आणि पाण्याच्या टाकीच्या जवळ असलेले चंदनाची झाडे तुटलेल्या अवस्थेत आढळली. 


जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यातून चंदनाची एकूण तीन झाडे चोरीला गेल्याचे दिसून आले आहे. तीन झाडे तोडून त्याचे बुंधे अज्ञात चोरांनी लंपास केले आहेत. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. (The theft of sandalwood trees from the Superintendent of Police's bungalow) पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याच्या परिसरात पोलिसांचा सदैव वावर असताना देखील चोरटयांनी केलेले धाडस हे आश्चर्यचकित करणारे ठरले आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !