BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑग, २०२२

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना धमकी !


 

शोध न्यूज : 'तीन तासात खल्लास करू' अशी धमकी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या कुटुंबाला आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस हे अत्यंत दक्ष झाले आहेत.


अलीकडेच अँटिलिया प्रकरण भलतेच गाजले होते, स्फोटके भरलेली गाडी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळून आली होती त्यामुळे बरीच खळबळ उडाली आणि त्यानंतर या प्रकरणाचे वेगवेगळे धागे समोर आले होते. त्यानंतर आज देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात असताना मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला पुढच्या तीन तासात ठार मारू असा धमकी देणारा फोन आला आणि पोलीस दलात प्रचंड वेगाने हालचाली सुरु झाल्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष असते आणि समाज विघातक कृती अशा दिवशी काहीतरी विध्वंसक कृती करण्याचा प्रयत्न करीत असतात. आज स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा होत असताना आलेली ही धमकी पोलिसांनी खूपच गंभीरपणे घेतली. 


रिलायंस रुग्णालयात हा धमकीचा फोन आला. 'मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचा पुढील तीन तासात खात्मा करू"अशी ही धमकी होती. विशेष म्हणजे हा धमकीचा फोन एकदा नव्हे तर तब्बल आठ वेळा आला. प्रत्येक फोनवेळी अज्ञात व्यक्ती ठराविक वाक्यच बोलत राहिला. रिलायंस फौंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हे फोन आले होते आणि त्याने मुकेश अंबानी यांचे नाव घेवून ही धमकी दिली. या धमकीमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि रुग्णालय प्रशासनाने तातडीने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. अँटिलिया प्रकरणानंतर धमकी येण्याची ही दुसरी वेळ असल्यामुळे पोलीस अधिकच सतर्क झाले. हा फोन कुठल्या दहशतवाद्याकडून आला आहे की कुणी मनोरुग्ण व्यक्तीने केला आहे याची नेमकी माहिती मिळत नव्हती. 


पोलिसांचे पथक तातडीने रुग्णालयात दाखल झाले आणि येथील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यात आले. रिलायन्स फौंडेशन संचालित या रुग्णालयाच्या मुख्य अधिकारी डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी एकूण आठ फोन येवून गेले असल्याचे पोलिसांना सांगितले. फोन करणारे हे दहशतवादी असून शकतात त्यामुळे आम्ही ही धमकी गंभीरपणे घेतली असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. आपण एक नंबरचा दहशतवादी असून मुकेश अंबानी ठार मारणार आहे असे ही अज्ञात व्यक्ती सांगत होती आणि एटीस, एनआयए, आणि मुंबई पोलिसांच्या संदर्भात तो आक्षेपार्ह भाषा वापरत होता आणि शिवीगाळ देखील करीत होता.  या सगळ्या यंत्रणांना आपण बघून घेवू अशी धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे. 


धमकीच्या घटनेनंतर अँटिलिया परिसरातील सुरक्षा अधिक वाढविण्यात आली असून पोलिसांनी धमकीचे रेकोर्डिंग ऐकले आहे. धमकी देणारा अज्ञात व्यक्ती हा मनोरुग्ण असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला होता. पोलिसांनी या घटनेबाबत सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Threat to the family of industrialist Mukesh Ambani) दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !