BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑग, २०२२

खून झालाय साहेब, लवकर या ..! पोलीसाना तब्बल एकशे दहा वेळा फोन !







शोध न्यूज : 'माझ्या मुलाचा खून झालाय साहेब, लवकर या !' असा एका महिलेने तब्बल ११० वेळा पोलिसांना फोन केला आणि स्वत:च सहा वर्षांसाठी तुरुंगाची हवा खायला गेल्याचा वेगळा प्रकार घडला आहे.


जनतेच्या सोयीसाठी पोलिसांशी संपर्क करण्यासाठी फोनची सुविधा मोफत असते. पण काही माथेफिरू अनेकदा पोलिसांना या मोफतच्या क्रमांकावर फोन करून त्रास देत असतात, खोटी माहिती देवून विनाकारण पोलिसांची धावपळ करीत असतात. आलेल्या फोननुसार पोलिसांना संबधित ठिकाणी धावत जावे लागते आणि तेथे गेल्यावर मिळालेली माहिती ही खोटी होती आणि फोन देखील बनावट होता हे समोर आल्याची अनेक प्रकरणे आजवर घडली आहेत. साधारणपणे असे फोन करणाऱ्या व्यक्ती या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा माथेफिरू असतात. कुणी उगीच गंमत म्हणून असा प्रकार करतात. अर्थात हे लोक पकडले जाऊन पोलीस त्यांना चांगलाच इंगाही दाखवत असतात..


गोंदियात मात्र एका महिलेने पोलिसांना असे सळो की पळो करून सोडले होते. "साहेब, माझ्या मुलाचा खून झालाय, लवकर या" असा फोन ती महिला पोलीस ठाण्यात करायची. एक दोनदा नव्हे तर या महिलेने ११२ क्रमांकावर तब्बल ११० वेळा फोन करून अशी माहिती देत पोलिसांची मदत मागितली. अनोळखी क्रमांकावरू येत असलेल्या या फोनवरून महिला मुलाचा खून झाला असल्याची माहित देत होती. ही माहिती खोटी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पण या महिलेने पोलिसांचा पिच्छा काही केल्या सोडला नाही. या फोनमुळे पोलीस त्रस्त झाले आणि त्यांनी या महिलेचा शोध घेवून तिला इंगा दाखविण्याचा निर्णय घेतला.या महिलेचा शोध घेण्यापूर्वी पोलिसांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि सदर महिलेला ताब्यात घेण्यासंदर्भात न्यायालयाची परवानगी घेतली. 


या महिलेचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळवल्यानंतर पोलीस या महिलेच्या शोधात लागले. पोलिसांनी अखेर या महिलेला शोधून काढले. तिच्याविरोधातील सर्व पुराव्यासह न्यायालयासमोर या महिलेला हजर करण्यात आले. न्यायालयात हे प्रकरण तपासले तेंव्हा या महिलेने तब्बल ११० वेळा पोलिसांना फोन करून खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले. (False information by calling the police Woman jailed) न्यायालयाने या महिलेस तब्बल सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहा वर्षे तुरुंगवास आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने या महिलेला ठोठावली. अशा प्रकारे खोटी माहिती देवून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.परंतु या महिलेने अशा प्रकारे पोलिसांना खोटे फोन करून कशासाठी हा प्रकार केला हे मात्र समोर आलेच नाही.     


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !