BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑग, २०२२

स्व. विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नींचा धक्कादायक खुलासा !

 


शोध न्यूज : स्व. आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असतानाच आता त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नी ज्योती मेटे यांनी धक्कादायक माहिती दिली असून अपघातावर संशय व्यक्त केला आहे.

शिवसंग्रामने नेते आणि आमदार विनायक मेटे यांचा काल सकाळी अपघाती मृत्यू झाला परंतु हा अपघात संशयाच्या धुक्यात अधिकच गुरफटत चालला आहे. अपघात झाल्यानंतर रुग्णालयात हलविण्यात आलेल्या आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले परंतु त्यानंतर लगेचच या अपघातावर शंका व्यक्त होऊ लागल्या. मेटे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आणि तेथून पुढे हाच विषय अधिक चर्चिला जात आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित करीत थेट चौकशीची मागणी केली आहे तर मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. मुंबईच्या बैठकीची वेळ अचानक कुणी बदलली आणि बीड येथून मुंबईला पोहोचणे कठीण असल्यचे मेटे यांनी सांगूनही कुणी दबाव आणला ? याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

या शंका आणि मागण्या होऊ लागल्या असताना स्व. विनायक मेटे यांच्या आईनी देखील काल असाच संशय व्यक्त केला आणि त्यानतंर तर स्व. मेटे यांच्या पत्नी यांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे आणि एकूण घटनाक्रम देखील सांगितला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे घटनेतील संशय अधिक वाढला आहे. स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी या डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्या विधानांना विशेष अर्थ आहे. मेडिकल  टर्मोनॉलॉजीप्रमाणे मृत्युनंतर एवढ्या लवकर मृताचा चेहरा पांढरा पडत नाही, मृत्यू झाल्यानंतर काही काळाने चेहरा पांढरा पडायला सुरुवात होते. विनायक मेटे यांचा चेहरा अतोनात पांढरा पडलेल्या होता असे त्यांच्या पत्नींनी स्पष्ट केले आहे.

विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नींनी एकूण घटनाक्रम सांगितला आहे. अपघाताची माहिती मिळाली तेंव्हा आपण धावत सुटलो, आपला भाऊ पोलीस विभागात उच्च पदावर अधिकारी आहे, त्याला फोन केला, विश्वास नांगरे पाटील यानाही मदतीसाठी फोन केला पण या दोघांनीही फोन उचलले नाहीत. गाडीच्या चालकाला सतत फोन करीत राहिले पण त्याच्याकडून मला अपघाताचे लोकेशन दिले जात नव्हते. अपघात नेमका कुठे झाला आहे याची विचारणा करूनही तो ठिकाण सांगत नव्हता. व्हॉट्स ऍपवर लोकेशन पाठवायला सांगितले पण तरीही त्याने पाठवले नाही. अखेर आपण वाहतूक पोलिसांना फोन केला तेंव्हा मेटे साहेबाना रुग्णालयात नेत्यात आल्याचे सांगण्यात आले अशी माहिती डॉ. ज्योती मेटे यांनी दिली आहे. 

आपण एमजीएम रुग्णालयात गेलो तेंव्हा मेटे साहेबांचा चेहरा जास्तच पांढरा दिसला. मेडिकल टर्मोनॉलॉजीप्रमाणे असे घडत नाही. मृत्यूनंतर एवढा लवकर चेहरा पांढरा पडत नाही, त्यांच्या काना- नाकातून रक्त येत होते, आपण नाडीचे ठोके तपासून पहिले पण उपयोग नव्हता. इसीजीमध्येही कसलीही हालचाल आढळून आली नाही. (Shocking revelation of Vinayak Mete's doctor wife) यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी आपणास बाहेर जाण्यास सांगितले तेंव्हा आपण डॉक्टर असून मेटे यांच्या पत्नी आहोत अशी माहिती त्यांनी डॉक्टरांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आपण अपघाताची माहिती मिळताच पाऊण तासाने रुग्णालयात पोहोचलो होतो आणि अपघात होऊन किमान दोन तास तरी झाले होते. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळाने आपणास फोन आला आहे. आता पोस्टमॉर्टेम च्या अहवालातून सर्व गोष्टी समजतील आणि अपघाताची नेमकी वेळ देखील समजेल असे त्यांनी म्हटले आहे.   

ट्रक चालकाला अटक !

अपघात झाल्यानंतर ट्रकसह पळून गेलेल्या चालकास पोलिसांनी अटक केली असून तो गुजरातमध्ये सापडला आहे. अपघाताबाबत अनेक शंका आणि संशय व्यक्त होत असून पोलीस सर्व अंगाने बारकाईने तपास करीत आहेत. अपघाताच्या भोवती संशयाचे प्रचंड धुके तयार झाल्यामुळे आता यातून काय बाहेर येतेय याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !