BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

पंढरपूर शहरात आणखी एका तरुणाची आत्महत्या !




शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पंढरपूर शहरातील आणखी एका तरुणाने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे.


पंढरपूर शहरात गेल्या काही काळात अनेक आत्महत्या झाल्या आहेत यातील बहुसंख्य आत्महत्या या तरुणांनी केल्या आहेत. सावकारी जाचातून देखील काही आत्महत्या होत असतात तर अन्य काही कारणांमुळे देखील अशा घटना घडू लागल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील लखन गांडुळे या पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाचा खून झाल्याचे नुकतेच उघडकीस आले असून त्याची हत्या करणारे दोघे पोलिसांच्या कोठडीत आहेत. या हत्येची घटना आणि चर्चा सुरु असतानाच आज एका तरुणाच्या आत्महत्येची घटना समोर आली असून गोविंदपुरा (गुर्जरवाडा) येथील तरुणाने आज राहत्या घरात गळफास लावून ही आत्महत्या केली आहे. 


आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश नेमिनाथ कदम असे असून त्याचे वय ३५ ते ३८ वर्षांचे असल्याचे सांगण्यात आले. पंढरपूर शहरात टांगा चालवून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पत्नी या होमगार्ड सेवेत असून त्या विठ्ठल मंदिरात आपल्या ड्युटीवर गेल्या असताना गणेशने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मयत गणेश कदम याला दोन मुले असून त्यातील एक मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. गणेशने उचललेले टोकाचे पाऊल त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक आहे. दुपारी गणेशने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर गोविंदपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात याची चर्चाही झाली आणि अनेकजण त्याच्या घराच्या परिसरात जमा झाले. 


गणेशने अचानक घेतलेल्या या निर्णयाचे कारण समजू शकले नाही, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कदाचित कर्जबाजारी झाल्याने हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा असली तरी पोलिसांच्या तपासात त्याबाबत नेमकी माहिती मिळण्याची शक्यता आहे. (
Suicide of youth in Pandharpur city, reason unknown) घरात लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.  गणेशच्या मित्रांनाही या घटनेने धक्का बसला असून गोविंदपुरा परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.   


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !