BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑग, २०२२

शिवसेनेच्या 'वाघाला' धमकावल्याचा मोठा आरोप !




मुंबई : ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून धमकावले जात असल्याचा आरोप राऊत यांचे वकील मनोज मोहिते यांनी न्यायालयात केला असून न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी दिली आहे. 

  

शिवसेनेचे खासदार संजय राऊत याना पत्राचाळ प्रकरणी ईडी ने अटक केली असून त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते . आज ही मुदत संपत असल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रवीण राउत यांनी दिलेली रक्कम राऊत यांच्या खात्यात कशी आली याची चौकशी करायची असून आम्हाला काही महत्वाची आणि नवीन कागदपत्रे मिळाली आहेत.  प्रवीण राऊत यांच्याकडून मिळालेल्या पैशातून संजय राऊत यांनी अलिबाग येथे जमिनीची खरेदी केली आहे असे ईडीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. 


अलिबागची जमीन खरेदी करण्यासाठी प्रवीण राऊत यांचाकडील रक्कम वापरण्यात आली आहे तसेच अन्य काही पुरावे आपल्या हाती आले आहेत. अनोळखी व्यक्तींकडून संजय राऊत यांच्या पत्नीला १ कोटी १७ लाख आणि १ कोटी ६ लाख  रक्कम मिळाली आहे त्याचीही चौकशी करायची आहे. ही अनोळखी व्यक्ती कोण ? याची माहितीही देण्यात आली नाही तसेच या व्यक्तीने ही रक्कम कशासाठी देण्यात आली हे देखील तपासून पाहायचे आहे असे ईडीने न्यायालयात सांगितले आणि आणखी कोठडीची मागणी करण्यात आली. 


दर महिन्याला प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना ठराविक रक्कम मिळत होती असे देखील ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले. विविध बाबींचा तपास करायचा बाकी असल्याने १० ऑगस्ट पर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीने न्यायालयात केली. संजय राउत हे चौकशीत सहकार्य करीत नसल्याचेही न्यायालयाला सांगितले गेले. संजय राऊत इडीकडून करण्यात आलेले आरोप हे काही नवे नाहीत. यापूर्वी देखील असे आरोप झाले असून त्याची चौकशीही झाली आहे असे राऊत यांचे वकील मोहिते यांनी न्यायालयाला सांगितले. आधी झालेल्या आरोपाबाबत आधीच चौकशी झाली असल्याने आता पुन्हा कोठडीची गरज नाही, चौकशी झालेल्या प्रकरणाची पुन्हा चौकशी कशासाठी असेही राऊत यांचे वकील मनोज मोहिते यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. 


राऊत यांच्यावरील कारवाई हे एक राजकीय षडयंत्र आहे याशिवाय दुसरे काही नाही, राजकीय द्वेष आणि आकसापोटी ही कारवाई करण्यात येत आहे. चौकशीवेळी ईडी कडून संजय राऊत यांना धमकावण्यात येत आहे. खोटा जबाब देण्यासाठी सांगितले जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या वकिलाने देखील संजय राऊत धमकी देत असल्याचे सांगितले पण न्यायालयाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत हे अटकेत असताना ते कशी धमकी देऊ शकतात असा सवाल न्यायालयाने केला.  त्यावर संजय राऊत हे एक राजकीय प्रभावशाली व्यक्ती असून अन्य लोकांच्या मार्फत धमकावले जात असल्याचे पाटकर यांच्या वकिलांनी सांगितले.

   

ईडी ने माफी मागितली ! 

अटकेत असलेले संजय राऊत यांनी ईडीबाबत न्यायालयात तक्रार केली, आपल्याला जेथे ठेवण्यात आले आहे तेथे खेळती हवा नसल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाकडे केली. आपल्याला हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती देखील न्यायालयाला देत इडीबाबत तक्रार केली. ही तक्रार ऐकून न्यायालयाने ईडी ला झापले. ईडीने यावेळी न्यायालयात माफी मागितली.

 

८ ऑगस्ट पर्यंत कोठडी 

तीन दिवसांची कोठडी संजय राऊत यांना देण्यात आली होती त्यानंतर आज ईडी, संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तीन पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ८ ऑगष्ट पर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे. १० ऑगष्ट पर्यंत कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने ८ ऑगष्ट पर्यंत कोठडी देण्यात आली. त्यामुळे संजय राउत यांना आणखी काही दिवस याच कोठडीत राहावे लागणार आहे. 

  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !