BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑग, २०२२

"लक्ष्मण" शक्ती पोखरणार आ. शहाजीबापूंचे "डोंगार" !

 



पंढरपूर : शिवसेनेचे प्रमुख टार्गेट असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना शह देण्यासाठी शिवसेना सज्ज होत असून लक्ष्मण हाके यांची 'लक्ष्मण'शक्ती  "डोंगार" पोखरून काढण्यासाठी सज्ज होऊ लागली आहे. 


शिवसेनेतून चाळीस आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेवर मोठे संकट आले, ज्यांनी भरभरून दिले त्यांच्याशीच गद्दारी केली असा आरोप शिवसेना सतत करीत असून या चाळीस जणांचा गद्दारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेवर अशी संकटे येण्याची ही पहिली वेळ नसली तरी एवढे मोठे संकट प्रथमच आले आहे त्यामुळे शिवसेनेच्या हे जिव्हारी लागले आहे. अशा परिस्थितीतही शिवसेना रडत बसली नसून नव्या उमेदीने लढण्याची आणि पुन्हा उभारी घेण्याची तयारी करू लागली आहे. शिवसैनिक प्रचंड आक्रमक होऊ लागले असून आगामी निवडणुकीत या चाळीसपैकी अनेक आमदारांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते. पुण्यात आ. उदय सामंत यांची गाडी फोडून शिवसैनिकांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. बंडखोर आमदार कितीही काही सांगत असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्यापुढे आव्हान उभे राहणार आहे याचे संकेत स्पष्ट होत आहेत. 


चाळीस आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले असले तरी आ. शहाजीबापू पाटील हे शिवसनेचे महत्वाचे टार्गेट बनले गेले आहे. या आमदारांत सुरतमध्ये पाहिलं पाऊल आपणच टाकले असल्याचे शहजीबपुनी स्वत:च सांगितले आहे. शिवाय "काय झाडी, काय डोंगार, काही हाटील .... ओक्के" हा संवादामुळे ते राज्यात आणि देशात चर्चेला आले आहेत. त्यामुळे त्यांचावर अधिक फोकस गेला आहे. या वाक्याने बापुना मोठी प्रसिद्धी मिळाली खरी पण त्यानंतर शहाजीबापू वेधडक बोलू लागले आणि शिवसेनेशी अधिक वैर पत्करू लागले. युवा शिवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर विखारी टीका देखील त्यांनी केली आहे आणि करीत आहेत. त्यामुळे टार्गेटच्या यादीत त्यांचे नाव सर्वात अग्रभागी येताना दिसून आले. 


शिवसेनेशी गद्दारी करणारे आता शिवसेनेच्या हिटलिस्टवर असून या चाळीस आमदारांना आगामी निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून यात ग्रामीण महाराष्ट्रातील शहाजीबापू पाटील, तानाजी सावंत हे पहिल्या यादीत आलेले आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले तरी किरकोळ मतांनी विजयी होणाऱ्या शहाजीबापूना शिवसेनेचा रोष महागात पडू शकतो.  शिवसेनेने शहाजीबापू पाटील यांना शह देण्यासाठी मात्तबर 'मल्ल'  शोधून काढून पहिला डाव जिंकला आहे. ओबीसी मोर्चाचे नेते लक्ष्मण हाके हे आता शिवसेनेत दाखल झाले असून शहाजीबापुना शह देण्याचा आपला इरादा त्यांनी बोलून दाखवला आहे. त्या दिशेने त्यांनी वाटचाल देखील सुरु केली असल्याचे दिसत आहे. 


लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील रहिवाशी असून उच्चशिक्षित देखील आहेत. त्यांनी आता आपल्या हातात शिवबंधन बांधले असून एका दमदार तयारीला लागले आहेत. आ. शहाजीबापू पाटील किंवा तानाजी सावंत हे किरकोळ मतांनी निवडून आलेले आमदार आहेत, ग्रामीण भागातील अठरा पगड जातीजमाती वाड्यावस्त्यावरून लोकांना भूलथापा देवून आणि पैशाची पेरणी करून ही माणसं निवडून आलेली आहेत. (
Shiv Sena's Laxman Hake will take revenge on MLA Shahajibapu Patil)  त्यांना घरी बसविण्यासाठीच मी शिवसेनेत आहे" असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. यातूनच त्यांचा इरादा स्पष्ट होत आहे.


होय, लढणारच !
आपण आता शिवबंधन बांधलेले असून शिवसेना देईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पेलणार आहोत.  पंचायत समिती पासून जिल्हा परिषदेपर्यंतच्या आगामी प्रत्येक निवडणुका शिवसेना लढणार असून संगोल्यातून शिवसेनेने आपणास शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात लढण्याची संधी दिली तर आपण मजबूतपणे लढणार आहोत असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले आहे.    

 

  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


अडगळ दूर झाली !
शिवसेना सद्या अडचणीत असल्याचे म्हटले जात असले तरी तशी परिस्थिती नाही . सेनेत असणारी अडगळ बंडखोर आमदार, खासदारांच्या रूपाने दूर झाली आहे. देश पातळीवर अनेक प्रादेशिक पक्ष अडचणीत आहेत पण शिवसेना एकटी हिम्मत दाखवत आहे आणि महाराष्ट्राला हे आवडले आहे. मराठी अस्मितेसाठी लढणारी, सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी शिवसेना ही संघटना आहे असेही हाके यांनी म्हटले आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !