BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑग, २०२२

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या !



सांगोला : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील एका नराधमास बेड्या ठोकण्यात आल्या असून या घटनेने सांगोला तालुक्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 


महिला अत्याचाराचा घटना वाढत असताना गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. कधी शेजारील व्यक्ती असे दुष्कर्म करीत असल्याचे दिसते तर कधी नात्यातलीच व्यक्ती हे पाप करीत असते. सांगोला तालुक्यात देखील नात्यात्यील आणि ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीने एक अल्पवयीन मुलीशी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. (Sexual assault on minor girl, accused arrested)सांगोला तालुक्यातील एका गावात हा गुन्हा घडला असून मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली तेंव्हा या प्रकाराला वाचा फुटली आहे. 


नात्यातील असलेल्या ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात आली. आईने मुलीला घेवून सांगोला पोलीस ठाणे गाठले. आईने आणि पिडीतेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेच हालचाल सुरु केली आणि पीडिता तसेच तिची आई यांचे जबाब घेवून गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी रोहिदास खडतरे यास तातडीने ताब्यात घेतले आणि त्याला अटक करण्यात आली. नात्यातील व्यक्तीनेच हे कृत्य केल्यामुळे सांगोला तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.  


वाळू टिप्पर पकडला !

सांगोला तालुक्यात रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी वाळू चोरीचा एक टिपर पकडला असून ३२ हजार किमतीची ४ ब्रास वाळू आणि १२ लाखांचा एक टिपर असा १२ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माण नदीच्या पात्रातून वाळू चोरून हा टिपर निघाला असता सावे रस्त्यावरील पुलाजवळ पोलिसांनी पकडून कारवाई केली. सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील टिप्पर चालक राहुल प्रकाश हजारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सावे पुलाखालील वाढेगाव चौकात ही कारवाई करण्यात आली आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !