BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ जुलै, २०२२

आयकर विवरणपत्राची मुदत अंतिम टप्प्यात, भरावा लागेल दंड !

 


आयकर विवरण पत्र सादर करण्याची मुदत आता केवळ तीन दिवस उरली असून या मुदतीत रिटर्न न भरल्यास दंड भरण्याची वेळ येणार आहे. हा दंड टाळण्यासाठी करदाते आता शेवटच्या टप्प्यात घाई करताना देखील दिसत आहेत. 


सन २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता संपत आली आहे. ही मुदत ३१ जुलै अखेर असल्यामुळे आता केवळ अवघे तीन दिवस उरले आहेत. काहीही कारण नसले तरी अनेक करदात्यांनी अद्याप हे रिटर्न भरलेले नाही. आज भरू, उद्या भरू करीत आता मुदत संपत आली आहे. ही मुदत वाढविली जाते असा आजवरचा अनुभव असल्याने अनेकजण मुदत वाढेल या आशेवर थांबलेले आहेत परंतु यावर्षी ही मुदत वाढविली जाणार नसल्याचे संकेत आधीच देण्यात आले आहेत. सीबीडीटीने ही मुदत वाढविण्यास नकार देखील दिला आहे.  मुदत संपल्यानंतर आयकर विवरणपत्र सादर करणाऱ्यास दंड भरावा लागणार आहे.  आयकर विभागाने वेळोवेळी ट्विटरवरून करदात्यांना आयकर विवरण पत्र वेळेत दाखल करण्याची आठवण करून दिली असून अंतिम मुदतीत वाढ केली जाणार नाही असे देखील सांगितले आहे. 


रिटर्न दाखल करण्याची मुदत संपत आल्यानंतर आता असंख्य करदाते रिटर्न दाखल करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. अखेरच्या काळात भार वाढल्याने तांत्रिक अडचणी देखील निर्माण होतात आणि वेळेत रिटर्न सादर करण्यास अडचण होते. २६ जुलैच्या एका दिवसात ३० ;लाखांपेक्षा अधिक करदात्यांनी आपले रिटर्न दाखल केले असून ३. कोटीपेक्षा अधिक रिटर्न २६ जुलै पर्यंत दाखल झालेले आहेत. ३१ जुलै ही अंतिम तारीख असून विवरणपत्र अद्याप सादर केले नसेल तर ते आत्ताच भरा आणि विलंबाची फी टाळा अशा प्रकारचे ट्विट आयकर विभागाने २७ जुलै रोजी केलेले आहे. त्यामुळे यावर्षी मुदत वाढवून मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे दिसत आहे. 


इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलै असून ज्यांनी या मुदतीत विवरणपत्र सादर केले नाही अशाना ३१ डिसेंबरपर्यंत बिलिटेड रिटर्न दाखल करता येणार आहे परंतु त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. प्राप्तिकर कायदा कलम २३४  एफ नुसार हे शुल्क आकारले जाते आणि जितका अधिकच उशीर त्यानुसार लेट फी लागू होत असते.  या कलमानुसार ५ लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांनी ३१ जुलैच्या नंतर रिटर्न दाखल केल्यास त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी दंडाची रक्कम एक हजार आहे आणि ज्यांना आयकर भरण्यापासून सूट दिली गेली आहे त्यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारचा दंड आकाराला जात नाही. 



मुदतीत आयकर भरला नसेल तर थकीत रकमेवर १ टक्का व्याज दयावे लागते आणि कराची रक्कम जर चुकीची असेल तरी देखील ३१ जुलै पासून नियमाप्रमाणे थकीत कर व्याजासह भरावाच लागणार आहे. जर एखाद्या महिन्यात ५ तारखेच्या पुढे रक्कम भरली असल्यास त्या महिन्याचे व्याज देखील भरावे लागणार आहे. (Income tax return deadline in final stage) विवरण पत्र दाखल करण्याची मुदत अजून तीन दिवस असली तरी अखेरच्या क्षणी काहीही अडचणी येण्याची शक्यता असते त्यामुळे रिटर्न दाखल न केलेल्यांनी घाई करून ते सादर करण्याची गरज आहे. आता केवळ तीन दिवस मुदत उरली आहे त्यामुळे दंडाची कारवाई टाळण्यासाठी वेळेत रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !