BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑग, २०२२

मुरूम टाकण्याच्या कारणावरून विळ्याने हल्ला !

 




पंढरपूर : शेतात मुरूम टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात लोखंडी विळ्याने एकावर हल्ला केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील विसावा मंदिराच्या जवळ या हल्ल्याची घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. घराच्या समोर मुरूम टाकण्याच्या कारणावरून वाद सुरु झाला आणि यातून एकावर थेट लोखंडी विळ्याने हल्ला करण्यात आला.  भटुंबरे (विसावा) येथील समाधान बजरंग जाधव याने युवराज हनुमंत अधटराव यांच्या शेतात मुरूम टाकला होता. समाधान हा शेतात काम करीत असताना युवराज अधटराव याने समाधान यास  फोन करून विचारणा केली. माझ्या जागेत तू मुरूम का टाकलास अशी विचारणा करीत समाधान यास शिवीगाळ करण्यात आली. 


केवळ फोनवर हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर नंतर समाधान आणि त्याचं कुटुंबियांना देखील शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. याचवेळी समाधान जाधव  आणि हातावर विळा मारून जखमी करण्यात आले. युवराज हणमंत अधटराव, आबा हणमंत अधटराव आणि विश्वनाथ हणमंत अधटराव यांनी हा हल्ला केल्यास म्हटले आहे. विश्वनाथ अधटराव आणि आबा अधटराव यांनी लोखंडी गज आणि विळा घेऊन वडिलांना देखील मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे. या हल्ल्यात समाधान जाधव जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सदर  प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !