BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ डिसें, २०२३

कोरोना पुन्हा दारात .... एकाच दिवशी झपाट्याने वाढली रुग्णसंख्या !

 


शोध न्यूज : कोरोना पुन्हा बळावत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या असतानाच, आता बाधितांची संख्याही वेगाने वाढू लागली असून केंद्राने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णवाढीमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. 


कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर आता कुठे मोकळा श्वास घेण्याची आणि दोन अडीच वर्षांच्या दणक्यातून सावरण्याची वेळ आली होती पण थंडीचे दिवस सुरु झाले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव देशात पुन्हा एकदा जाणवू लागला होता. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे नष्ट झाला नसल्याचे तज्ञांकडून सांगितले जात होते. काही प्रमाणात कोरोना जाणवू लागला असताना आता मात्र त्याने पुन्हा एकदा भीती निर्माण केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट झाली असून, प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढू लागला असला तरी, केरळ राज्यात याचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. केरळची आकडेवाढ धडकी भरवणारी ठरू लागली आहे. त्यामुळे केरळच्या शेजारी असणारी राष्ट्रे अधिक सतर्क झाल्याचे दिसत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेत, सावधगिरी बाळगणे सुरु झाले असून केंद्र सरकारकडूनही राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. 


केरळ राज्यात रुग्ण वाढू लागले असतानाच येथेच JN1 चा पहिला रुग्ण आढळून आला त्यामुळे सरकार आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.  केंद्र सरकारकडून याबाबत सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आणि सर्व राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याच्या सूचन केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. काल सोमवारी एकाच दिवसात केरळमध्ये  कोरोनाचे तब्बल १११ नवे रुग्ण आढळून आले असून, उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आत १ हजार ६३४ एवढी झाली आहे. देशात एकूण १२७ प्रकरणे नव्याने समोर आली असून यातील १११ रुग्ण केवळ केरळमधील आहेत. मागील चोवीस तासांत यातील एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. मागील तीन वर्षात केरळमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७२ हजार ५३ वर जाऊन पोहोचली आहे. आता नव्याने झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा अत्यंत सतर्क झाली आहे. 


केंद्र सरकार देखील आता अलर्ट मोडवर असून राज्यांना खबरदारीचे उपाय योजण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे आपण कोरोनाचा प्रभाव कमी करू शकलो. परंतु अजूनही  उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक या  आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी गती कायम ठेवणे महत्त्वाचे असल्याचे केंद्राने आपल्या पत्रात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र फारशी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. सर्दीसारखी लक्षणे आणि तीन ते पाच दिवसांचा सामान्य ताप अशी लक्षणे जाणवू शकतात, नव्या व्हेरीएंट रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता पडत नाही. कोरोनाचे लसीकरण झालेले असून, ही लस कोरोनाच्या प्रत्येक व्हेरीएंटसाठी प्रभावी ठरलेली आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. क्वचित प्रकरणात अतिरिक्त डोस वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु कोरोन लसीचे अतिरिक्त डोस देण्याची आवश्यकता नसल्याचे डब्लू एच ओ ने म्हटले आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, घाबरून जाण्यापेक्षा वेळीच दक्षता घेणे हे आवश्यक ठरत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वेळीच सावधगिरी न बाळगल्यामुळे, कोरोना अधिक फैलाव करण्यात यशस्वी झाला होता. (Rapid increase in the number of corona patients) केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या मोठी दिसत होती, त्याची मोठी किंमत चुकती करावी लागली आहे, त्यामुळे यावेळी तरी सतर्कता अधिक महत्वाची ठरू लागली आहे. 


महाराष्ट्रातही वाढ !

कोरोना रुग्णांची वाढ महाराष्ट्रात देखील सुरु झाली असून आज नव्याने १३ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यात आता ही संख्या २४ वर गेली आहे परंतु कोणत्याही रुग्णावर रुग्णालयात उपचार करण्यात येत नाहीत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी हे रुग्ण आढळून येणे सुरु झाले होते. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !