BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑग, २०२२

धावत्या एस. टी. बस च्या चालकाला आला हार्ट अटॅक आणि ---

 



पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यावरून धावत निघालेली असतानाच अचानक बसच्या चालकास हृदयविकाराचा झटका आला पण आपला मृत्यू दिसत असताना या बसचालकाने बसमधील पंचवीस प्रवाशांचा जीव मात्र वाचवला आहे. 


कुठल्याही वाहनातून प्रवास करताना प्रवाशांचे प्राण हे केवळ वाहनाच्या चालकाच्या हाती असतात. चालकाने बेफिकिरी केली तर वाहनातील प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो आणि अनेकदा चालकाच्या चुकीने प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. वाहनावर चालाकाचेच नियंत्रण असते आणि प्रवाशांच्या हाती काहीच नसते. त्यामुळे चालकाच्या कुठल्याही गोष्टींचा थेट परिणाम प्रवाशांवर होत असतो. अनेक चालक मद्यपान करून वाहन चालवतात तेंव्हा तर कुठल्याही क्षणी अपघाताची शक्यता असते. परंतु वाहन रस्त्यावरून सुसाट धावत असताना अचानक चालकाला चक्कर आली, हृदयविकाराचा झटका आला तर त्यात चालकाचा दोष नसतो आणि अशावेळी अपघात होऊन प्रवाशांचे प्राण जाणे जवळपास निश्चित असते. असाच प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या बसबाबत झाला पण चालकाने आपला प्राण देवूनही २५ प्रवाशांना वाचवले आहे.

 

पुणे - सातारा महामार्गावर ही मोठी घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) वसई आगाराची प्रवाशांना घेवून म्हसवडच्या दिशेने धावत होती. वरवे नसरापूर गावाच्या हद्दीत ही बस आल्यानंतर चालक पवार यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच पवार यांना चक्कर आली त्यामुळे बस अनियंत्रित होऊन अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली. अशा अवस्थेत देखील चालक पवार यांनी बसवरील नियंत्रण सुटू दिले नाही आणि प्रसंग ओळखून त्यांनी आपली बस रस्त्याच्या बाजूला घेवून उभी केली.  आपला जीव संकटात असतानाही चालकाने प्रसंगावधान राखले आणि बसमधील प्रवाशांना वाचवले. 


खेड शिवापूर टोल नाका ओलांडून बस पुढे आली तेंव्हा बसचा वेग कमी झाला होता त्यामुळे वाहकाने चालकाला विचारणा केली. चक्कर येत असल्याचे सांगत चालक पवार यांनी आपली बस रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यानंतर वाहकाने पुन्हा चालकाला आवाज दिला पण चालकाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची कसलीही हालचाल होत नव्हती. वाहकाने बसमधील प्रवाशांच्या मदतीने चालक पवार यांना नसरापूर येथील दवाखान्यात नेले पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. (Running S. T. Bus driver has heart attack) आपला मृत्यू समोर पहात असताना बसमधील २५ प्रवाशांचा जीव वाचवत या चालकाने अखेरचा श्वास घेतला होता. 


बस चालक पवार यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ झाला असता आणि २५ प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. अगदी अखेरच्या क्षणी बस चालक पवार यांनी कशीबशी बस रस्त्याच्या कडेला घेवून थांबवली. बस थांबतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. जग सोडण्यापूर्वी मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पंचवीस प्रवाशांचे जीव वाचवले.    



  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !