BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑग, २०२२

डाळींबाच्या बागेत मोठी गांजा लागवड, शेतकऱ्याला बेड्या !

 



जत : डाळिंबाच्या बागेत केलेली गांजाची लागवड चव्हाट्यावर आली असून उमदी पोलिसांनी शेतात धाड टाकून १३  लाखांचा गांजा पकडला असल्यामुळे सांगली जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतात, डाळिंब, कांदा, ऊस अशा पिकांत कायद्यानुसार बंदी असलेल्या गांजाची लागवड करीत असल्याचे सतत समोर येत आहे. राज्याच्या विविध भागातून अशा घटना उघडकीस येत आहेत. शेती करणे हे कठीण काम झाले असून शेती परवडत नाही आणि शेतीमालाला योग्य भाव देखील मिळत नाही त्यामुळे शेतकरी कायद्याचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने अन्य पिकात गांजा लागवड करीत आहेत. शेती परवडत नाही म्हणून असा बेकायदेशी प्रकार करणे समर्थनीय नाही तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यात हा वेगळा विषय येतो आणि हा प्रकार पकडला जातो. अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा वेगळ्या अडचणीत सापडतो. 


गांजाची लागवड अन्य पिकात केली तरी गांजाची झाडे मोठी झाली की त्याचा वास दूरपर्यंत जातो आणि ही चोरी उघडकीस येते. शिवाय आसपास असलेल्या शेतकऱ्यांना याचा सुगावा लागतच असतो आणि कुणीतरी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवते. अखेर सगळेच मुसळ केरात जात असते. सांगली जिल्ह्यातील उमदी तालुक्यातील माणिकनाळ येथे देखील असाच प्रकार समोर आला असून डाळींबाच्या बागेत लागवड केलेला १३ लाख ३९ हजार १०० रुपये किमतीचा १३३ रुपये किलो  गांजा उमदी पोलिसांनी छापा टाकून पकडला. संशयित शेतकरी महासिद्ध बगली याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जत तालुक्यात गांजा लागवडीचे प्रमाण अधिक असून पोलिसांच्या कारवाया होत असतानाही हा प्रकार कायम असल्याचे दिसत आहे.

   
महासिद्ध लक्ष्मण बगली या शेतकऱ्याच्या शेतात डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड  मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या शेतात धाड टाकली असता गांजा लागवड केली असल्याचे निदर्शनास आले. पाच ते सात  फूट उंचीची गांजाची हिरवीगार झाडे डोलत असल्याचे पोलिसांना दिसून आले. ( Cultivation of cannabis in pomegranate, farmer arrested) पोलिसांनी १३३ किलो ९१ ग्रॅम ओला गांजा जप्त करून शेतकरी बगली यास अटक केली आहे.  


दीड कोटींचा गांजा !
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा गांजा लागवडीच्या बाबतीत कुप्रसिद्ध आहे. कायद्याची भीती न बाळगता या परिसरातील अनेक शेतकरी गांजाची लागवड करतात. यापूर्वी उमदी पोलिसांनीच करजगी येथील उसाच्या पिकातून तब्बल दीड कोटींचा गांजा जप्त केला होता. ही झाडे पोलीस ठाण्यात आणण्यासाठी दोन ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली होती.   

  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !