BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

जेवणात पडली पाल, दोन मुलांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु !

 



शोध न्यूज : जेवणात पाल पडली आणि एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा होऊन दोन लहानग्या मुलाचा मृत्यू झाला तर बाकीचे रुग्णालयात उपचार घेत आहेत. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ही विपरीत घटना घडली आहे. 


थोडीशी वेपर्वाई जीवावर बेतू शकते आणि हेच या घटनेमुळे समोर आले आहे. पाल ही विषारी असते हे प्रत्येकाला माहित आहे आणि ही पाल प्रत्येक घरात असते. हळूहळू या पाली घरात वाढत जातात आणि मग काही केल्या घरातून जात नाहीत.  त्यामुळे घरात पाली असतील तर सावधानता बाळगणे आवश्यक आहे पण तिकडे फारसे गंभीरपणे पहिले जात नाही. या दुर्लक्षाचे काय परिणाम भोगावे लागतात हे मुंबईमधील विरारच्या खान कुटुंबाला आता चांगलेच कळले आहे. विरार पूर्व मांडवी परिसरातील कण्हेरच्या नालेश्वर नगरात राहणारे अशफाक खान  हे रिक्षा चालवून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.. पत्नी आणि पाच मुले असे त्यांचे कुटुंब असून दिवसभर रिक्षा चालवून रात्री ते घरी आले. घरी आल्यावर आपल्या कुटुंबासह त्यांनी जेवण केले. 


रात्रीच्या वेळेस त्यांच्या पाचही मुलांना पोटात दुखण्याचा त्रास होऊ लागला, मुलांच्या उलट्याही होऊ लागल्या. खान यांनी लगेच रात्रीच्या वेळेलाच मुलांना रुग्णालयात दाखल केले. अन्नातून विषबाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. कुटुंबाने एकत्र आणि एकच जेवण घेतले होते परंतु अशफाक खान आणि त्यांच्या पत्नीला मात्र कसलाही त्रास झाला नाही. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर यातील पाच वर्षे वयाचा आसिफ खान आणि ७ वर्षीय फरीन खान या दोघांचा मृत्यू झाला. फराना खान (वय १०), आरिफ खान (वय ४) आणि साहिल खान (वय ४) ही तीन मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळास भेट दिली असून जेवणाचे नमुने ताब्यात घेवून तपासणीसाठी पाठवले आहेत. 


जेवणात कधी पाल पडली हे अशफाक खान याच्या पत्नीच्या लक्षातही आले नाही दोन मुलांचा जीव मात्र नाहक गेला असून अन्य तीन मुलांच्या बाबतीत काय घडतेय याची चिंता उरली आहे. घरातील महिलांनी व्यवस्थित काळजी न घेतल्यास काय होऊ शकते याचे हे बोलके उदाहरण ठरले आहे. (Poisoning by falling sails, Death of two children) टी. व्ही. कडे लक्ष देत किंवा मोबाईलशी खेळत अनेक महिला स्वयंपाकघरात काम करीत असतात, त्यांच्यासाठी हा एक मोठा धडा मानला जात आहे.     


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !