BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑग, २०२२

विहिरीचे पाणी घेतले, चार शेतकरी गोत्यात !

 


वडगाव : विहिरीतील पाणी परस्पर घेतल्याच्या कारणामुळे चार शेतकरी गोत्यात आले असून त्यांच्यावर थेट पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गेल्या काही काळापासून पाणीसुद्धा कळीचे कारण ठरू लागले आहे. पाण्यावरून नळावर तर भांडण होतच असते पण राजकारणात देखील पाण्यावरून संघर्षही होती आणि पाण्याचे राजकारण देखील करण्यात येते.  पाण्यासाठी महायुद्ध देखील होऊ शकते असे काही जाणकारांची सांगितलेले आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथील चार शेतकऱ्यांना मात्र आपली पिके जगवणे महागात पडले आणि विहिरीतील पाणी त्यांच्या अंगाशी आले आहे. दिसले म्हणून पाणी घेतले असे सहज कुणी सांगत असले तरी ते अडचणीत आणू शकते हेच या घटनेने दाखवून दिले आहे. (A case has been registered against farmers for stealing well water) शेजारील विहिरीतील पाणी घेतल्यामुळे हे शेतकरी थेट चोर ठरले आहेत.

 
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर तुकाराम निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथील शेतकरी प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जादाह्व, राहुल ज्ञानेश्वर जाधव, अतुल ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरुद्ध हा चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 


फिर्यादी असलेले निवृत्त पोलीस अधिकारी रोकडे यांची सुपे येथे वडिलोपार्जित जमीन आहे. रोकडे मात्र ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहतात. त्यांच्या सुपे येथील शेतात विहीर असून या विहिरीला पुरेसे पाणी देखील आहे. विहिरीचे मालक परगावी असतात त्यामुळे बांधावर असलेल्या विहिरीतील पाणी शेजारील शेतकऱ्यांनी घेतले . विहिरीतून पाणी घेण्यापूर्वी मालकाची परवानगी तर घेतली नाहीच पण त्यांच्या संमतीशिवाय विजेची जोडणी घेवून विहिरीवर विद्युत पंप देखील लावण्यात आला.

 
विहीर मालकाला काहीही माहिती न देता अथवा त्यांची परवानगी न घेता या शेतकऱ्यांनी विद्युत पंप लावून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरु केलेला होता. याची मालकाला काहीही कल्पना नव्हती. यात्रेच्या निमित रोकडे हे गावी आले आणि शेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. आपल्या परस्पर आपल्या विहिरीतील पाणी घेतले जात आहे आणि विजेची जोडणी देखील घेण्यात आलेली आहे हे पाहून त्यांचा संताप अनावर झाला. 


फिर्यादी रोकडे यांनी याबाबत विचारणा केली असता सदर शेतकऱ्यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपणासह आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती त्यामुळे गावाकडील जमिनीकडे दुर्लक्ष झाले होते. याचाच गैरफायदा उठवत शेजारी शेतकऱ्यांनी बेकायदा आणि आपली संमती न घेता विहिरीतील पाणी चोरल्याची फिर्याद दिल्यानंतर पाणी चोरीचा गुन्हा या चार शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आला आहे. या घटनेची परिसरात उलट सुलट चर्चाही सुरु झाली आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !