BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

राष्ट्रवादीचे पाच बडे नेते "ईडी" च्या रडारवर !


 

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ईडी चौकशीबाबत कालपासून राज्यात खळबळ उडाली असतानाच आता भाजपच्या खासदाराने राष्ट्रवादीचे पाच प्रमुख नेत्यांची चौकशी ईडी करणार असल्याचा दावा केला असून राज्यात भूकंप घडविणारी ही घटना आहे. 


भारतीय जनता पक्षाच्या मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आणि राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी देखील त्यांचा रोख राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे असल्याचे आता स्पष्ट झाले आहेच. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना घेरण्याचा मोठा प्रयत्न केला असल्याचे दिसत असून जुन्या सिंचन घोटाळ्याची फाईल आता उघडली जात आहे. (Five big leaders of NCP on the radar of "ED".) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करून अजित पवार यांना क्लिनचीट दिलीही होती परंतु न्यायालयात अजून ती तशीच प्रलंबित आहे. 


सिंचन घोटाळ्याप्रकरणी आता ईडी चौकशी करणार असल्याच्या बातम्या बाहेर आलेल्याच आहेत आणि राष्ट्रवादीत अंतर्गत वातावरण ढवळले जाऊ लागले आहे. त्यातच भाजपचे माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज एक मोठा स्फोट पंढरपूर येथे केल आहे. हा एक मोठा भूकंप मानला जाऊ लागला असून राष्ट्रवादीच्या पाच मोठ्या नेत्यांची चौकशी इडीकडून लवकरच केली जाणर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासदार निंबाळकर हे आज पंढरपूर येथे आले होते त्यावेळी त्यांनी हा मोठा धक्का दिला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना भाजपकडून एकेक आणि मोठे धक्के दिले जात आहेत. 


लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार असून यात राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांची नावे आहेत.  खा. निंबाळकर यांनी राष्टवादीच्या कुठल्याही नेत्याचे नाव घेतले नाही पण त्यांच्या सूचित करण्यातून काही नावांचा अंदाज येत आहेच. "राष्टवादीमध्ये अनेक चोर आहेत, त्यातील कोणता चोर नेता आहे हे लवकरच समोर येईल. लवासा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बारा वर्षानंतर समन्स बजावले आहे. सरकारने कारवाई करण्याचे धोरण निश्चित केले असेल तर मोठा घोटाळा बाहेर येणार आहे असे देखील खा. निंबाळकर यांनी म्हटले आहे.  


सद्या राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरु असून राष्ट्रवादीने शिंदे फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचे धोरण घेतले आहे. विरोधकांनी या नव्या सरकारची लक्तरे काढायला सुरुवात केली असतनाच भारतीय जनता पार्टीकडून अशा प्रकारे एकेक आणि मोठे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आधी मोहित कंबोज आणि आता खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी धक्का दिला आहे  राज्याच्या राजकारणात याची मोठी चर्चा होता असली तरी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे दबावतंत्र असू शकते असे देखील बोलले जाऊ लागले आहे. काहीही असले तरी भाजपच्या या धक्कातंत्राने राजकारण मात्र रोज नव्याने ढवळले जात आहे. प्रत्यक्षात या धक्क्यात किती जोर आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. परंतु इडीने ही चौकशी केली तर मात्र राष्ट्रवादीला 'जड' जाण्याची शक्यता आहे. 


यासाठीच दबावतंत्र ?

शिंदे गट किती काळ टिकेल आणि तो किती काळ भाजप सोबत राहील याबाबत भाजपात शंका असून राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी राष्टवादीवर दबाव आणत असल्याचेही आता बोलले जाऊ लागले आहे. यात किती तथ्य आहे हे सद्या कुणीच सांगू शकणार नाही परंतु शिंदे गटाला वगळून राष्ट्रवादीसोबत सरकार बनले जावे म्हणून राष्ट्रवादीला अशा प्रकारे घेरले जात असल्याचेही काही जाणकार बोलू लागले आहेत.  शिवसेना फोडून शिंदे गट भाजपसोबत आला आहे पण त्यातही अंतर्गत नाराजी असून न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे या सरकारचे भवितव्य आधीच टांगणीला लागलेले आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप असा 'प्लॅन  B' असू शकतो असे मत व्यक्त होऊ लागले आहे.   

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !