BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

आईचे जोडवे बाळाच्या घशात ! डॉक्टरलाही बसला धक्का !





शोध न्यूज : अवघ्या आठ महिन्याच्या बाळाने अशी काही करामत केली की डॉक्टरलाही धक्का बसला आणि बाळाच्या माता पिता तर केवळ पहातच राहिले, लहान बाळाकडे बारकाईने लक्ष द्यावे हाच धडा मात्र बाळाच्या या कृतीने दिला आहे. 


आठ महिन्याच्या बाळाला धड चालताही येत नाही मग ते काय करामत करणार? असा स्वाभाविक प्रश्न कुणालाही पडू शकतो. बाळ खेळत राहावं म्हणून त्याच्या जवळ वेगवेगळी खेळणी टाकली जातात, त्याला आकर्षित करील अशा वस्तू ठेवल्या जातात. बाळाचं पोट भरलं असलं की बाळ या वस्तूंकडे पहात राहतात आणि खेळतही असतात. भूक लागली की टाहो फोडणारे बाळ आईच्या कुशीत शिरून दुध पिते आणि पुन्हा शांत होते. बारामती येथील आठ महिन्याचे बाळ दुध प्यायलाच तयार नव्हते. नव्हे, त्याने दूध पिणे सोडूनच दिले होते. एवढंसं लहान बाळ दूध पिणे बंदच करते हा प्रकार पाहून त्याच्या पालकांना चीत्ना वाटू लागली. लहान बाळाला वेळीच दूध नाही मिळाले तर ते रडायचं थांबत नाही आणि या बाळाने मात्र दूध प्यायचंच बंद केलं होतं !


सुरुवातीला काहीसं दुर्लक्ष केलं पण पुन्हा मात्र हा प्रकार चिंताजनक वाटू लागला आणि त्याला बारामतीच्याच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केल्यावर डॉक्टरांना देखील धक्का बसला आणि बाळाचे आई वडील तर केवळ पहात राहिले. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि दूध प्यायला हे बाळ का तयार होत नव्हतं याचं उत्तर डॉक्टरांनी घेतलेल्या एक्स रे मधून मिळालं होतं. बालरोग तज्ञ डॉ. सौरव मुथा यांच्याकडे या बाळाला नेल्यानंतर त्यांनी तपासणी केली. काही वैद्यकीय तपासण्यासह एक्स रे देखील घेतला गेला. हा एक्स रे पहिला तेंव्हा बाळाच्या घशात चक्क आईच्या पायातील जोडावे आढळून आले. आईच्या कुशीत खेळता खेळता बाळाने आईच्या पायातील जोडवे कधी काढले आणि गिळून टाकले हे कुणाच्या लक्षातही आलेले नव्हते. आणि असे काही असेल अशी कल्पनाही कुणाला आली नव्हती. 


आईच्या पायातील जोडवे बाळाच्या घशात अडकलेले होते त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याने दूध पिणे देखील बंद केलेले होते. डॉ. मुथा यांनी तातडीने या बाळास निंबाळकर हॉस्पिटल येथे पाठवले. तेथे त्याची शस्त्रक्रिया झाली आणि घशातील जोडवे बाहेर काढण्यात आले. तेंव्हा कुठे आई वडिलांच्या जीवात जीव आला. (Metal in the baby's throat, the doctor was shocked) शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती ठीक असून कुटुंबानेही मोकळा श्वास घेतला आहे.   


बल्बही गिळला होता !

अलीकडेच झारखंडमधील एक अशीच घटना उजेडात आली होती. केवळ सहा महिन्याच्या बाळाने प्लास्टिक बल्ब गिळला होता. हा बल्ब दोन इंचाचा होता. प्रिया कुमारी असं नाव असलेल्या या बालिकेला खूप त्रास होत असल्याने ती रडत, ओरडत होती. कुटुंबाने आधी घरच्या घरीच हा बल्ब काढण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही. अखेर डॉक्टरनी मोठे परिश्रम घेवून हा बल्ब काढला होता. अशा घटना घडू नयेत म्हणून बारकाईने लक्ष देणे एवढाच उपाय आहे.         


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !