BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑग, २०२२

झुंजार आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू !

 


शोध न्यूज : आमदार आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे - मुंबई महामार्गावर अपघात झाला असून या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. 

 

आमदार विनायक मेटे हे बीड येथून मुंबईकडे निघाले असताना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर यांच्या गाडीला अपघात झाला. आज पहाटेच्या वेळेस अपघाताची ही घटना घडली असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर उपचारासाठी त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबई - पुणे दरम्यान एका बोगद्यात हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मेटे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्याच एका सहकाऱ्याने दिली होती. या अपघातात त्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक आणि मेटे यांचा मुलगा जखमी झाले आहेत.  (MLA Vinayak-Mete’s car accident Pune Munbai express way) जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. अपघाताच्या घटनेनंतर एका तासाने त्यांना मदत मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 


या अपघातात आमदार विनायक मेटे (वय ५२) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.  अत्यंत लढाऊ बाण्याचे कणखर नेते अपघातात गेल्याने महाराष्ट्र हळहळ व्यक्त होवू लागले आहे. राज्यातील अनेक नेते रुग्णालयात पोहोचले आहेत. मेटे यांच्या या अपघाती निधनाने राज्यात शोक व्यक्त केला जात आहे. अपघात नेमका कशाप्रकारे झाला याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही परंतु या अपघाताने महाराष्ट्रातील एक मोठा नेता गमावला आहे. आ. विनायक मेटे यांच्या डोक्याला, छातीला मोठा मार लागला आहे तर गाडीचेही  मोठे नुकसान झाले आहे.   


मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी आज ते मुंबईला निघाले होते. आज दुपारी ही बैठक होणार होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सतत आवाज उठवला होता, त्यामुळे मराठा समाजाची मोठी हानी झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अत्यंत लढाऊ प्रवृत्तीचे आमदार मेटे यांनी शिवस्मारक उभारण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. 'शिवसंग्राम' कार्यकर्त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !