BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑग, २०२२

आ. विनायक मेटे यांचा अपघात की घातपात ?

 




शोध न्यूज : आमदार विनायक मेटे यांचा सकाळी झालेला मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला असून पोलिसांनी आ. मेटे यांच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


शिव संग्राम चे अध्यक्ष  आणि आमदार विनायकराव मेटे यांचा आज सकाळी भल्या पहाटे अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला असून त्यांच्या वाहनांची परिस्थिती पाहता अपघात हा मोठा होता पण या अपघातातून या गाडीचा  चालक बचावला आहे. एकटे आ. मेटे यांचाच मृत्यू झाला आहे. (Vinayak Mete's accident suspicious) सकाळी या अपघाताची बातमी येताच सर्वानी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. राजकीय वर्तुळाला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. आ. मेटे यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त होत असतानाच या अपघाताबाबत शंका उपस्थिती करण्यात येऊ लागल्या आहेत. 

 

सुरुवातीला आमदार विनायकराव मेटे यांच्या कार्यकर्त्यांकडूनच या अपघाताबाबत शंका उपस्थित करून चौकशीची मागणी पुढे आली आणि त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हा अपघात आहे की घातपात आहे ? अशी शंका व्यक्त करीत अचानक झालेल्या या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकतीच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर घडले आहे. राज्यात ही मोठी घडामोड सुरु असतानाही विनायक मेटे यांच्यासारख्या नेत्यांनी याबाबत एका शब्दानेही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. कसली प्रतिक्रियाही त्यांनी दिली नाही परंतु आता अचानक त्यांना मुंबईला बैठकीसाठी म्हणून बोलावण्यात आले. मेटे याना नेमके कुणी मुंबईला बोलावले होते ? कशासाठी बोलावले होते? याबाबत देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खा. अरविंद सावंत यांनी केली आहे.   


भल्या सकाळी अपघात झाल्यानंतर प्रचंड वर्दळीचा रस्ता असताना त्यांना कसलीही मदत मिळाली नाही आणि जी मदत पोहोचली ती वेळेवर पोहोचली नाही. वेळेत मदत पोहोचली असती तर विनायक मेटे यांचा प्राण वाचू शकला असता. वेळेत मदत न मिळणे ही बाबा शंकास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत भाष्य केलेलं असून सदर आरोपांच्या बाबत माहिती तपासून घेतली जाईल. घटनेची चौकशी वगैरे सगळ्या गोष्टी नंतर होतील पण घटना दुर्दवी आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  


आ, विनायक मेटे यांच्या गाडीला धडक दिलेली गाडी तेथे थांबलेली नसून चालक पळून गेला आहे. पोलिसांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मेटे यांची कार ट्रकला पाठीमागून धडकली आहे, अपघात झाल्यानंतर ट्रकचालक तेथून पळून गेला आहे, त्याचा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. एकूण या अपघाताची सर्व बाजूने चौकशी सुरु करण्यात आली असून एका मोठ्या ट्रकला कार पाठीमागून धडकली आहे अशी माहिती मिळत आहे. या ट्रकचा शोध तर घेतला जात आहेच परंतु सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.  या घटनेची चौकशी आठ पथके करीत आहेत. 


आमदार विनायक मेटे यांच्या या अपघाताबाबत शंका उपस्थित झाल्या असून याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील होत आहे. आ. मेटे यांचा हा अपघात हा अपघातच आहे की घातपाताची घटना आहे याबाबत पोलिसांच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे. दरम्यान आज आ. मेटे यांच्या कारच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे या घटनेची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे आता या चौकशीत कुठले सत्य समोर येतेय याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 


 वेळ कुणी बदलली ? 

मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनीही चौकशीची मागणी केली आहे. मंत्रालयातून शनिवारी मेटे यांना दोन वेळा फोन आले होते. आधी ही बैठक रविवारी दुपारी चार वाजता ठरली होती आणि नंतर सायंकाळी सात वाजता त्यांना पुन्हा फोन आला आणि ही बैठक दुपारी १२ वाजता असल्याचे सांगितले गेले. आपण बीड येथे असून एवढ्या तातडीने कसे पोहोचता येईल असे आमदार मेटे म्हणाले परंतु तातडीने मुंबईला येण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव टाकला आणि बैठकीची वेळ कशी बदलली गेली याचीची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे


सरकार जबाबदार !

सरकारने जी चौकशी करायची ती कारवाई पण आमदार विनायकराव मेटे यांच्या मृत्यूला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे असे छत्रपती संभाजी राजे यांनी महाले आहे.  अपघात झाल्यावर एक तासाने उशिरा आपत्कालीन मदत मिळालेली आहे . पुणे - मुंबई हा रहदारीचा मार्ग आहे त्यामुळे येथे मदत दिल्या जाणारी दोन ते तीन वाहने असायला हवीत, केंद्र आणि राज्य सरकारने तशी तरतूद करायला हवी असल्याचे देखील छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !