औरंगाबाद : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार काही होत नाही पण आमदार न होता आणि कुणाच्या मागे न लागता एका पट्ठ्याने चक्क मंत्रीपद मिळवले असून या स्वयंघोषित मंत्रीमहोदयाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले आणि शिंदे - फडणवीस या दोघांचेच सरकार महिन्यापासून अस्तित्वात आले. महिना झाला तरी या मंत्रीमंडळाचा विस्तार काही केल्या होत नाही. एक मुख्यमंत्री आणि एक उप मुख्यमंत्री असे दोघेच महिन्यापासून राज्याचा कारभार पाहत आहेत त्यामुळे राज्यात टीका होत आहे. अन्य मंत्री नसल्याने राज्यातील जनतेची कामे खोळंबली असल्याच्या तक्रारी देखील होत आहेत. होणार होणार असे सांगितले जात आहे पण राज्याच्या मंत्रीमंडळाची संख्या काही वाढेना त्यामुळे दोघांचे सरकार टीकेचे धनी होऊ लागले आहे. मंत्रीपद मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असले तरी औरंगाबाद शहरातील दोघांनी मात्र एक कमालच केली आहे आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अलीकडे कुणाच्या सुपीक डोक्यातून काय येईल हे सांगता येत नाही. अनेक आंदोलनेही अशी असतात की ती वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे भलतीच गाजत असतात. असाच काहीसा हा प्रकार आहे. राज्याचे मंत्रीमंडळ स्थापन होत नाही आणि जनतेची कामे रखडली आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वत:च स्वत:ला मंत्री म्हणून घोषित केले आहे आणि खाते देखील घेतले आहे. औरंगाबाद येथील एक वकील तरुण भरत फुलारे यांनी स्वत:ला सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित केले आहे आणि आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर तसा फलक देखील लावला आहे. केवळ फलक लावण्यापुरते ते थांबले नाहीत तर त्यांनी नागरिकांची समस्यांची निवेदने देखील स्वीकारली आहेत.
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण कटिबद्ध आहोत, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामजिक न्याय मंत्री पदाची जबाबदारी आपल्यावर असून ही जबाबदारी कुणी आपल्यावर लादलेली नसून आपण स्वत:च ती स्वीकारली आहे असे पेशाने वकील असलेले भरत फुलारे सांगत आहेत. (Minister without contesting elections) त्यांनी आपल्या या कृतीतून राज्याच्या विविध खात्यासाठी अजून स्वतंत्र मंत्री मंडळ नसल्याकडे आणि त्यामुळे जनतेची कामे रखडत असल्याकडेच अंगुलीनिर्देश केल्याचे दिसत आहे.
मला शिक्षणमंत्री करा !
स्वयंघोषित सामाजिक न्यायमंत्री झालेले फुलारे या एकट्याच तरुणाने असे लक्ष वेधले नसून आणखी एकाने तर त्याच्याही पुढे मजल मारली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेले संतोषकुमार मगर यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच एक निवेदास्न दिले आहे आणि मंत्रीमंडळाचा विस्तार होईपर्यंत आपली शिक्षणमंत्री म्हून नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागाला स्वतंत्र मंत्री नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत, त्यामुळे आपल्यावर शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास आपण ही कामे करू असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
- अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !