पंढरपूर : पंढरपूर येथे रेल्वेने चौघांना चिरडले असून यातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना आज सकाळी समोर आली आहे .
मिरजकडून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालवाहतूक रेल्वेने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चौघांना उडवले आहे. टाकळी येथील रेल्वेच्या पुलावर ही दुर्घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. रेल्वेने चौघांना चिरडले असून या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण अत्यंत गंभीर अवस्थेत असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर मृत आणि जखमी हे छत्तीसगड येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची घटना अपघात आहे की आत्महत्या ? असा प्रश्न सद्या तरी उपस्थित होताना दिसत आहे. घटनेच्या दुतर्फा लोक वसाहत असून आज सकाळी काही नागरिकांनी हा प्रकार पहिला आणि याची माहिती शहरभर पसरली. अधिक माहिती मात्र अद्याप हाती आली नाही.
- मृतांच्या आकड्यांबाबत संभ्रम असून या घटनेत दोघांचाच मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी असल्याचे सांगितले जात आहे !
रेल्वेने चिरडल्याने मृतदेहांची अवस्था अत्यंत छिन्न विच्छिन्न झालेली होती. एकाचवेळी आणि पहाटेच्या सुमारास चार जण कसे काय चिरडले गेले ? हा अपघात आहे की सामुदायिक आत्महत्या आहे ? असे प्रश्न नागरीकातून उपस्थित केले जात आहेत. हे चौघे या ठिकाणी कशासाठी गेले होते याचीही काही माहिती उपलब्ध झालेली नसून मृतांची नावे देखील समजू शकली नाहीत. (Four people were crushed under the train at Pandharpur) पोलिसांच्या तपासातच या घटनेचे रहस्य समोर येणार आहे परंतु या घटनेने आज सकाळी सकाळीच पंढरीला हादरवून टाकले आहे. सकाळपासून या घटनेची चर्चा पंढरीत सुरु आहे.
- अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !